सोलापूर : सोलापुरात अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अक्षरा मारुती जाधव असे आत्महत्या केलेल्या 16 वर्षीय मुलीचे (Solapur Crime News) नाव आहे. अज्ञात कारणावरून अक्षरा हिने गळफास घेत आत्महत्या केल्याची पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. काल संध्याकाळी 4.30 च्या सुमारास अक्षरा हिने आपल्या घरात साडीच्या साह्याने आत्महत्या (Solapur Crime News) केली आहे.दरम्यान प्राथमिक माहितीनुसार अक्षरा जाधव ही यंदा दहावीला होती. कुटुंबियांनी अभ्यासाला बस म्हटल्याच्या रागातून तीने टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा परिसरात आहे.या घटनेनंतर पोलिसांनी अज्ञात करणावरून आत्महत्या अशी नोंद करतं तपास सुरु केला आहे.(Solapur Crime News)

Continues below advertisement

Solapur Crime News: नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, 'अभ्यासाला बस' असं आईनं म्हटल्याच्या रागातून एका दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. अक्षरा जाधव (वय १६, रा. समाधान नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर) असे मृत मुलीचे नाव आहे. सोमवारी ३१ ऑगस्ट रोजी दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास अक्षरा हिने तिच्या राहत्या घरी अज्ञात कारणावरून पत्राच्या अँगलला साडीच्या साह्याने गळफास घेतला. ही बाब निदर्शनास आल्यानंतर नातेवाईकांनी तिला तातडीने गळफासावरून खाली उतरवून उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल, सोलापूर येथे दाखल केले. तिच्या भावाने दुपारी ४.२० च्या सुमारास रुग्णालयात दाखल केले असता, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.(Solapur Crime News)

तर मिळालेल्या माहितीनुसार, तिचे आई-वडील हे दोघेही वीटभट्टीवर काम करतात. यामुळे कुटुंबाची परिस्थिती हलाखीची आहे. सोमवारी आईने 'दहावीला आहेस तू अभ्यास करत जा' म्हणून ओरडले होते. या रागातूनच तिने आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. मुलगी दहावीत होती आणि आईने तिला 'अभ्यासाला बस' असे म्हटल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलले. या प्रकरणाची नोंद अज्ञात कारणातून झाल्याची नोंद करण्यात आली असून, पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

Continues below advertisement