Solapur Crime News :  सोलापुरात सुरेश श्रीराम या युवकाची भर रस्त्यात हत्याझाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तसेच या प्रकरणातील सर्व आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी इंस्टाग्रामला स्टेटस ठेवत ही हत्या केली आहे. पूर्वी दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी नकार दिल्याने सर्व आरोपींनी दिवसाढवळ्या कोयता आणि दगडाने ठेचून मारल्याची फिर्याद नोंदवण्यात आली आहे.

Continues below advertisement

विविध कलमान्वये एकूण 6 जणांवर जेलरोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल 

या प्रकरणी मुख्य आरोपी विजय श्रीराम, याच्यासह एकूण 6 जणांवर जेलरोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. बीएनएस कायद्याचे कलम 103(2), 126(2), 189(1) (2), 190, 91, 91(3) यासह शस्त्र अधिनियमासह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी विजय श्रीराम, रोहीत रेड्डी, सुभाष सगडा, करण श्रीराम, सुमित श्रीराम आणि राहुल रेड्डी अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत. तर मृताची पत्नी लक्ष्मी श्रीराम यांनी याविरोधात फिर्याद दिली आहे. दरम्यान आरोपींनी तसेच त्यांच्या समर्थकांनी स्टेटस ठेवत हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. 

नेमकं प्रकरण काय?

पाच वर्षापूर्वी डुक्कर पालनाच्या व्यवसायात भांडण झाली होती, त्याबाबतची सुनावणी कोर्टात सुरू आहे. याचाच राग मनात धरून रविवारी सोलापूर शहरातील माधव नगर येथील मुख्य रस्त्यावर लाठ्या काठ्या धारदार शस्त्र आणि दगडाने ठेचून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. मारहाण करताना, तोंडावर दगडाने ठेचून मारतानाचे सीसीटीव्ही सोशल मीडियावर वायरल झाले आहेत. सुरेश कृष्णा श्रीराम (वय अंदाजित 42 वर्षे)असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. वराह पालनाच्या व्यवसायातून पाच वर्षापूर्वी सुरेश श्रीराम जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला होता याबाबतची नोंद सोलापूर शहरातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याच केसची सुनावणी सुरू असताना, सुरेशची भर चौकात निर्दयीपणे हत्या करण्यात आली आहे.

Continues below advertisement

आणखीन एक संशयित आरोपी फरार

पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांनी या खुनाबाबत अधिकृत माहिती दिली आहे. ह्या करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर आल्याने, त्या आधारे सोलापूर पोलीस संशयित आरोपीचा तपास करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार एकूण सहा संशयित आरोपी आहेत त्यापैकी पाच आरोपी ना पोलिसांनी ताब्यात घेतले असून आणखीन एक संशयित आरोपी फरार आहे.

महत्वाच्या बातम्या:

Mumbai Crime news: मुंबईत धक्कादायक घटना, मुलुंडमध्ये फेरीवाल्याचा चाकू हल्ल्यात मृत्यू, पत्नीशी अनैतिक संबंधाचा रागातून टोकाचं पाऊल