Beed Ex Deputy Sarpanch Suicide Case: कलाकेंद्रातील नर्तिकेच्या आहारी जाऊन स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या करणारे गेवराई तालुक्यातील लुखामसला गावाचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (Govind Barge) यांच्याविषयी आता नवनवीन माहिती समोर येताना दिसत आहे. गोविंद बर्गे यांचे नर्तिका पूजा गायकवाड हिच्याशी प्रेमसंबंध (Love Relation) होते. गेवराईतील बंगला माझ्या नावावर करा आणि माझ्या भावाच्या नावावर पाच एकर जमीन करा, अशी मागणी पूजा गायकवाड (Dancer Pooja Gaikwad) हिने केली होती. ही मागणी पूर्ण न केल्यास तुमच्यावर बलात्काराचा (Rape News) गुन्हा दाखल करेन, अशी धमकी 21 वर्षांच्या पूजा गायकवाड हिने गोविंद बर्गे यांना दिली होती. याच तणावातून गोविंद बर्गे यांनी पूजा गायकवाड हिच्या बार्शी तालुक्यातील सासुरे गावातील घराजवळ स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती.

Continues below advertisement

गोविंद बर्गे यांचे गेल्या दीड वर्षांपासून पूजा बर्गे हिच्याशी प्रेमसंबंध होते. या काळात गोविंद बर्गे यांनी पूजाला सोन्याचे दागिने करुन दिले होते. तिच्या भावाला महागडा मोबाईल आणि बुलेट गाडी घेऊन दिली होती. एवढेच नव्हे गोविंद बर्गे यांनी पूजाच्या सांगण्यावरुन तिच्या नातेवाईकांना पैसे आणि त्यांच्या नावावर जमीन करुन दिली होती. एकूणच गोविंद बर्गे यांनी नर्तिका पूजा गायकवाड हिच्यावर पाण्यासारखा पैसा उधळला होता. मात्र, याच गोविंद बर्गे यांच्या खिशात मृत्यूवेळी फक्त 900 रुपये उरले होते. यशिवाय, त्यांच्या गाडीत बिअरचे कॅन सापडल्याची माहिती पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यात नमूद करण्यात आली आहे.

गोविंद बर्गे यांच्या मेहुण्याने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांना कला केंद्रात जायची सवय होती. 2024 मध्ये धाराशिवमधील तुळजाभवानी केंद्रात गोविंद बर्गे यांची पूजा गायकवाड हिच्याशी ओळख झाली. ती मूळची सोलापूरच्या बार्शी येथील होती. या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्यावर पूजाने गोविंद यांना म्हटले की, आजपासून मी तुमची मालकीण म्हणून सगळं काम करते. त्यामुळे आता तुम्ही माझा सगळा घरखर्च पाहायचा. त्यानुसार गोविंद बर्गे हे पूजाला आणि तिच्या नातेवाईकांना पैसे देत होते. पारगाव कला केंद्रातील पूजाच्या मावशीच्या नावे बर्गे यांनी एक प्लॉट घेऊन दिला होता. याशिवाय बर्गे यांनी पूजाच्या नातेवाईकांना तीन एकर शेतीही घेऊन दिली होती. तसेच पूजाच्या घराचे आरसीसी आणि पीओपीच्या कामासाठी गोविंद बर्गे यांनी पैसे दिले होते, असे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

Continues below advertisement

आणखी वाचा

नर्तिका पूजाच्या प्रेमात ठार वेडा; कलाकेंद्रा व्यतिरिक्त, घरी तर कधी बीड कधी वैरागच्या लॉजवर भेटायचे, गोविंद बर्गे प्रकरणात नवा खुलासा समोर