Solapur Accident News : सोलापूर जिल्ह्यातूनएकअपघाताचीमोठीबातमीसमोरआलीआहे. यात देवदर्शनासाठी आलेल्या डोंबिवलीच्या (Dombivli  ) वाहनाचाअपघातझाला. याभीषणअपघातात (Accident News) चार भाविकांचादुर्दैवी मृत्यू झालाआहे. मंगळवेढा-पंढरपूर रोडवर (Mangalwedha Pandharpur Road) असलेल्या शरद नगर येथे काल, सोमवारच्या रात्री हि भीषण अपघाताचीघटनाघडलीय.

Solapur Accident : देवदर्शन करून परतीच्या प्रवासासाठी निघाले असतानाअपघात, चार भाविकांचा मृत्यू, पाच गंभीर जखमी

मिळलेल्यामाहितीनुसार, कंटेन आणि क्रुझरची समोरासमोर झालेल्या भीषण धडकेमध्ये चार भाविकांचा मृत्यू झाला असून पाच भाविक गंभीर जखमी झाले आहेत. तुळजापूर आणि अक्कलकोट देवदर्शन करून येणाऱ्या क्रुझरमधील भाविकांच्या गाडीला कंटेनरने दिलेल्या धडकेमुळे हा भीषण अपघात झाला. अपघातातील सर्व भाविक डोंबिवली येथील असून सलगच्या सुट्टीमुळे देवदर्शन उरकून ते परत पंढरपूर रेल्वे स्टेशनकडे परतीच्या प्रवासासाठी निघाले होते. दरम्यनरात्रीच्यावेळीअंदाजआल्यानेहाअपघातझाल्याचाअंदाजआहे. अपघातातील जखमींना सोलापूर, मंगळवेढा आणि पंढरपूर या तीन ठिकाणी उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

Jalna Accident News : जालन्यात खाजगी ट्रॅव्हल्सला अचानक भीषण आग, ट्रॅव्हल्स पूर्णपणे जळून खाक

दुसरीकडे, जालन्यात देखीलएका खाजगी ट्रॅव्हल्सला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. छत्रपती संभाजीनगरते जालना रोडवरील शेलगाव जवळ पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. ट्रॅव्हल्सच्या टायरचे घर्षण झाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून या खाजगी ट्रॅव्हल्स मध्ये 27 प्रवासी प्रवास करत होते. हे सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. ही खाजगी बस पुण्यावरून यवतमाळच्या दिशेने जात होती. ही आग एवढी भीषण होती की यासाठी अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी दीड तास लागले.

Raigad : रायगडच्या पुनाडे घाटात पर्यटकांच्या वाहनाचा अपघात, 5 प्रवाशी जखमी 

किल्ले रायगडावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या वाहनाला रायगड-मानगाव रोडवरील पुनाडे घाटात अपघात झाल्याची घटना समोर आलीय. या अपघातात एकूण पाच प्रवाशी जखमी झालेत. वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने माणगाव रायगड रोडवरील पुनाडे येथील अवघड वळणावर हा अपघात झाल्याची घटना घडली असून या अपघातातील जखमींवर प्राथमिक आरोग्य केंद्र पाचाड येथे उपचार सुरू आहेत.

आणखी वाचा