Solapur Accident News: सोलापूर शहरातूनएकभीषणअपघाताची (Accident News) मोठीबातमीसमोरआलीआहे. यात सोलापूर-विजापूर (Solapur-Bijapur Road) बायपास रोडजवळ झालेल्या भीषण अपघातात (Accident) दोन तरुणांचा जागीच मृत्यू झालाय. भरधाव कारची कंटेनरला जोरदार धडक झाल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या अपघातात इमादुद्दीन बागवान आणि अमन बागवान या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झालाय. हाअपघातइतकाभीषणहोताकियातदोन्ही वाहनांचंप्रचंडनुकसानझालंअसून कार अक्षरशः चक्काचूर झालीय. याघटनेनंपरिसरातखळबळउडालीअसूनसध्यापुढीलकारवाईपोलीसकरतआहे. (Solapur Accident News)
Solapur Accident News : रोजा इफ्तार केल्यानंतर दोघे चहा पिण्यासाठी निघाले अन्....
मिळालेल्यामहितीनुसार, काल (13 मार्च) संध्याकाळी रोजा इफ्तार केल्यानंतर हे दोघे तरुण चहा पिण्यासाठी आणि फेरफटका मारण्यासाठी बाहेर निघाले होते. रात्री 8.30 ते 9 च्या सुमारास सोलापूर-विजापूर बायपास रोडजवळ त्यांच्या कारची कंटेनरला जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता कि कार अक्षरशः चक्काचूर झालीय. तर या भीषण अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची रुग्णवाहीका तात्काळ घटनास्थळी झाली. तर घटनेची माहिती मिळताच सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती. तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Nanded : सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने कॉलेजमध्ये जाऊन स्वतःला पेटवले, घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
नांदेडच्या एमजीएम कॉलेजमध्ये एकाने स्वतःला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना घडलीय. या घटनेचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सुनील कुलकर्णी असे या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे नाव असून कोलेजकडून त्यांची काही रक्कम येणे बाकी होते. ती रक्कम देण्यास टाळाटाळ होत असल्याने त्याने अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला पेटवून घेतले. यात ते गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर आधार हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. या घटनेने एमजीएम कॉलेजमध्ये खळबळ उडाली होती. या प्रकरणी विमानतळ पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. हे कॉलेज माजी शिक्षण मंत्री कमलकिशोर कदम यांचे असून इथे कर्मचाऱ्यांना वेळेवर पगारी मिळत नसल्याच्या तक्रारी असल्याचे या निमित्ताने चर्चिल्या जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
