Dombivli News : डोंबिवलीत (Dombivli) धक्कादायक घटना समोर आली आहे. डोंबिवली खोनी रोड वरील एका उच्चभ्रु सोसायटीमध्ये साप, सरडे, विविध प्रकारचे कासव णि चिंपाजी माकड यांसारखे प्राणी डांबून ठेवण्यात आलं होतं. मुंबई ठाण्याच्या वन विभागाच्या पथकाला ही माहिती मिळाली. त्यनंतर वन विभागाच्या पथकाने छापेमारी करत प्राण्यांची सुटका केली. 


हाय प्रोफाईल सोसायट्यांमध्ये राहणारे नागरिक घरात आणि मोठमोठ्या हॉटेलात अशा प्रकारचे प्राणी अंधश्रद्धेपोटी पाळतात.या प्राण्यांची लाखो,करोडो रुपयात खरेदी केली जात असल्याचीही माहिती समोर आलेली आहे. तसेच या प्राण्यांची तस्करी करण्यात आल्याची माहितीही वन विभागाच्या तपासामध्ये उघड झाली आहे.  याप्रकरणी पोलिसांनी फैजान खान या आरोपी विरोधात वनविभागाच्या कायद्यान्वये  गुन्हा दाखल केला आहे. पण हा आरोपी सध्या फरार आहे.                                             


वनविभागाची कारवाई


आरोपी फैजान याने पलावा सिटीमध्ये सवरना इमारतीमध्ये बी विंगमध्ये एक घर भाड्याने घेतलं होतं. या घराचा वापर वन्यप्राण्यांची तस्करी करण्यासाठी केला जात होता. पण याबबत सोसायटीमधील कुणालाच काही कल्पना नव्हती. यासंदर्भात मुंबई आणि ठाणे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. या माहितीच्या आधारेच वनविभागाने कारवाई केली असल्याची माहिती समोर आलेली आहे. 


वनविगाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने परिसरामध्ये सापळा रचला. त्यानुसार या फ्लॅटमध्ये छापा टाकण्यात आला. तेव्हा डांबून ठेवलेले परदेशी प्राणी पाहून सर्वांनाच धक्का बसला. सोनेरी,पांढऱ्या,हिरव्या यांसारख्या विविध रंगाचे मोठमोठे साप बॉक्समध्ये भरुन ठेवल्याचं आढळून आलं. हे पाहून सगळ्यांनाच मोठ धक्का बसला. त्याचप्रमाणे  वेगवेगळ्या प्रकारचे 7 ते 8 कासव, एग्वणा सरडा, चिंपाजी माकड देखील वेगवेगळ्या खोल्यांमध्ये आणि बाथरुमध्ये पिंजऱ्यात कैद करुन ठेवण्यात आल्याचं सापडलं. या प्रकारात पोलिसांनी पुढचा तपास कसा करणार आणि आरोपीला काय शिक्षा देणार हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. 


ही बातमी वाचा :                                                           


Crime News: रस्त्यात अडवून मारहाण, मैत्रिणीचा जबडा केला फ्रॅक्चर, पुण्यातील धक्कादायक प्रकार, नेमकं काय घडलं?