Ketan Agrawal and Siya Goyal: पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल याची काही दिवसांपूर्वी लोहगडावरुन ढकलून देऊन हत्या करण्यात आली होती. केतन अग्रवाल याचा सिया गोयल हिच्याशी विवाह ठरला होता. मात्र, सिया गोयलला (Siya Goyal) त्याच्याशी लग्न करायचे नसल्याने सियाने तिचा प्रियकर चेतन चौधरी (Chetan Chaudhari) याच्या मदतीने केतनला लोहगडावर नेऊन 400 फूट खोल दरी, ढकलून दिले होते. यामध्ये केतनचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा तपास वेगाने सुरु असताना आता पुण्यातील राजकीय नेत्या संगीता तिवारी यांनी एक नवीन दावा केला आहे. लोहगडावरील (Lohagad Fort) दरीतून जेव्हा केतनचा मृतदेह बाहेर काढण्यात आला, त्यावेळी एका व्यक्तीने 'केतनच्या अंगात धुगधुगी शिल्लक आहे, त्याचा जीव वाचू शकतो. लवकर रस्ता मोकळा करा, रुग्णवाहिका बोलवा', असे म्हटले होते. त्या व्यक्तीचे हे वाक्य ऐकून शेजारीच उभी असणारी सिया गोयल (Ketan Agrawal) दचकून बाजूला झाली होती. केतन जिवंत असल्यास आपले सगळे बिंग फुटले, अशी भीती सिया अग्रवालला वाटल्याचे संबंधित व्यक्तीने संगीता तिवारी यांना सांगितल्याचा दावा त्यांनी केला आहे. (Pune Crime news)
संगीता तिवारी यांनी सिया गोयल हिच्या वैयक्तिक चारित्र्याविषयीही भाष्य केले आहे. संगीता तिवारी यांनी सियाच्या काही मैत्रिणींविषयी माहिती दिली. 'मी त्या मुलींचे फोटो दाखवू शकत नाही. मात्र, या तीन-चार मुलींच्या बॉयफ्रेंडला घेऊन सिया गोयल महाबळेश्वरला गेली होती, तिला असल्या सवयी होत्या. सिया महाबळेश्वरवरुन परत आल्यानंतर या मैत्रिणींनी तिला जाब विचारला होता. तेव्हा सियाने त्यांची माफी मागितली. त्यावर मैत्रिणींनी सियाला कुत्र्याची उपमा दिली', असे संगीता तिवारी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
सिया गोयल ही सातत्याने पार्टीजला जायची. रात्री तिचे वडील साडेआठच्या सुमारास झोपले की सिया गोयल अकराच्या सुमारास तयार होऊन कोरेगाव पार्क, मुंढवा येथील क्लब्समध्ये जायची. सकाळी साडेतीन-चारला ती घरी यायची, असा दावाही संगीता तिवारी यांनी केला.
आणखी वाचा
