विजापूर : मालमत्तेच्या वादातून कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील चडचण (Chadchan Crime Land Dispute) तालुक्यात असलेल्या गोविंदपूर गावात शुक्रवारी भीषण (Chadchan Crime Land Dispute) हत्याकांड घडले. धारदार शस्त्रांनी हल्ला करून त्यानंतर गोळ्या झाडत सहा जणांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील भीमा नदी परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, या भागातील जुन्या वैमनस्याच्या घटना पुन्हा चर्चेत आल्या आहेत.(Chadchan Crime Land Dispute)
पोलिस आणि स्थानिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निराळे आणि गोळगी कुटुंबांमध्ये सुरू असलेल्या दीर्घकालीन जमीन वादातून हा रक्तरंजित संघर्ष उफाळून आला. हल्लेखोरांनी प्रथम धारदार शस्त्रांनी हल्ला केला आणि त्यानंतर गोळीबार करत सहा जणांचा जीव घेतल्याचा आरोप आहे. या घटनेत रेवणसिद्धप्पा निराळे, दुंडप्पा रेवणसिद्धप्पा निराळे, शिवपुत्र रेवणसिद्धप्पा निराळे, चंद्रशेखर निराळे आणि शब्बीर नदाफ यांचा मृत्यू झाला. तसेच आणखी एका व्यक्तीचाही मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा सहावर पोहोचल्याची माहिती पोलिसांनी दिली.(Chadchan Crime Land Dispute) शेतजमिनीच्या मालकी हक्कावरून दोन्ही कुटुंबांमध्ये अनेक वर्षांपासून तणाव होता. हा वाद मिटवण्यासाठी काही दिवसांपूर्वी स्थानिक स्तरावर मध्यस्थीची बैठकही घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.(Chadchan Crime Land Dispute)
शुक्रवारी जमीन वादावर तोडगा काढण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या आणखी एका बैठकीसाठी निराळे कुटुंबातील सदस्य आणि इतर काही जण गेले असता त्यांच्यावर हल्लेखोरांच्या टोळीने अचानक हल्ला चढवला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.(Chadchan Crime Land Dispute)
मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गावात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणी चडचण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. घटनेबाबत अधिक तपशील अद्याप समोर आलेला नाही.
Chadchan Crime Land Dispute : भीमातीर पुन्हा रक्तरंजीत
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील भीमा नदीच्या तीरावरील गावांमध्ये जमीन वाद, अनैतिक संबंध तसेच स्थानिक वैमनस्याच्या कारणांवरून यापूर्वीही अनेक खून आणि हिंसक घटना घडल्या आहेत. गेल्या काही वर्षांत अशा घटनांमध्ये काहीशी घट झाल्याचे बोलले जात असतानाच या सामूहिक हत्याकांडामुळे भीमेचा परिसर पुन्हा एकदा रक्तरंजीत झाला आहे.
Chadchan Crime Land Dispute : २५ एकर जमिनीवरून वाद
गोविंदपूर येथील निराळे कुटुंब हे चडचण परिसरातील प्रतिष्ठित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबांपैकी एक मानले जाते. या मोठ्या संयुक्त कुटुंबात ३० हून अधिक सदस्य वास्तव्यास आहेत. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले चंद्रशेखर निराळे हे माजी तालुका पंचायत सदस्य होते.
प्राथमिक माहितीनुसार, सुमारे २५ एकर जमिनीच्या व्यवहारातून हा वाद अधिक तीव्र झाला होता. निराळे कुटुंबाने ही जमीन प्रतिएकर १५ लाख रुपयांप्रमाणे खरेदी केली होती. मात्र, बाजारभाव जास्त असताना कमी दरात जमीन विकली गेल्याने गोळगी कुटुंब नाराज होते. संबंधित जमीन स्वतः खरेदी करण्याची इच्छा असलेल्या अप्पुगौडा गोळगी यांनी निराळे कुटुंबाला हा व्यवहार करू नये, अशी धमकी दिल्याची माहितीही समोर आली आहे.
तरीही जमीन व्यवहार पूर्ण झाल्यानंतर संतप्त झालेल्या गोळगी कुटुंबीयांनी सूडाच्या भावनेतून हल्ला केल्याचा आरोप केला जात आहे. ऊस तोडणीसाठी वापरल्या जाणाऱ्या धारदार शस्त्रांचा या हल्ल्यात वापर झाल्याचे सांगितले जात आहे. निराळे आणि गोळगी कुटुंबांमध्ये गेल्या १५ वर्षांपासून जमिनीच्या मालकीवरून वाद सुरू होता. संबंधित जमीन निराळे कुटुंबाने खरेदी केल्यानंतर हा संघर्ष अधिकच चिघळला आणि अखेर त्याचे रूप रक्तरंजित हत्याकांडात झाले.
Chadchan Crime Land Dispute : भीमा खोऱ्यातील रक्तरंजीत इतिहास
भीमा नदीचे खोरे हे अनेक वर्षांपासून हिंसक संघर्षांसाठी ओळखले जाते. उत्तर कर्नाटकातील टोळी युद्धे, ऐतिहासिक जातीय संघर्ष तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातील विविध वादांमुळे हा परिसर वारंवार चर्चेत राहिला आहे. कर्नाटकातील सिंदगी आणि इंडी तालुक्यांमधील भीमा नदीकाठच्या गावांमध्ये जमीन वादातून रक्तरंजित संघर्ष आणि टोळी युद्धांचा मोठा इतिहास आहे.
सोनना आणि देवणगाव यांसारख्या प्रतिस्पर्धी गावांतील वैरातून सुरू झालेले संघर्ष पुढे टोळी युद्धे आणि सूड हत्यांमध्ये परिवर्तित झाले. या भागात बेकायदा गावठी पिस्तुलांची मोठ्या प्रमाणावर उपलब्धता असल्यानेही हा परिसर कुप्रसिद्ध मानला जातो. शेजारील राज्यांतून अशा शस्त्रांची तस्करी होत असल्याचेही बोलले जाते. त्यामुळे भीमा नदी परिसर आणि गावठी पिस्तुले हे अनेक दशकांपासून एकमेकांशी जोडले गेलेले विषय मानले जातात.
