एक्स्प्लोर

Sindhudurg Crime News : सिगारेट पेटवायला लायटर न दिल्यानं संताप, भावाच्या डोक्यात टॉमी मारला अन्...; सिंधुदुर्गात रक्तरंजित थरार

Sindhudurg Crime News : देवगड तालुक्यातील वरेरी येथे सिगारेट पेटवण्यासाठी लायटर न दिल्याच्या किरकोळ कारणावरून एका 20 वर्षीय युवकाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

Sindhudurg Crime News : देवगड (devgad) तालुक्यातील वरेरी येथे सिगारेट पेटवण्यासाठी लायटर न दिल्याच्या किरकोळ कारणावरून एका 20 वर्षीय युवकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांच्या (Police) प्राथमिक तपासात ही माहिती समोर आली आहे. खून झालेल्या युवकाचे नाव कृष्णकुमार जुगराज यादव (20) असून तो मूळचा मध्यप्रदेशातील आहे. सद्यस्थितीत तो वरेरी, कुळये सडेवाडीनजीक असलेल्या चिरेखाणीवर राहत होता. या प्रकरणी पोलिसांनी त्याच परिसरात राहणाऱ्या रितीक दिनेश यादव (20) या संशयित आरोपीला अटक केली आहे. कृष्णकुमार आणि रितीक हे चुलत भाऊ असून, काही दिवसांपूर्वीच ते कामासाठी मध्यप्रदेशातून देवगडमध्ये आले होते. सध्या पोलिसांकडून या हत्येमागील अधिक तपशीलवार चौकशी सुरू असून, परिसरात या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Sindhudurg Crime News)

याबाबत अधिक माहिती अशी की, वरेरी, कुळये सडेवाडीनजीक असलेल्या चिरेखाणीवर सध्या सुमारे 8 ते 10 परप्रांतीय कामगार कार्यरत आहेत. याच ठिकाणी कृष्णकुमार यादव आणि रितीक यादव हे चुलत भाऊ देखील काम करत होते. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास, या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. वादाचा कारण ठरले सिगारेट पेटवण्यासाठीचा लायटर. रितीक याने कृष्णकुमारकडे लायटर मागितला, मात्र वाद वाढल्याने कृष्णकुमारने रितीकच्या कानशिलात मारले. या अपमानामुळे संतप्त झालेल्या रितीकने ट्रकमधून लोखंडी टॉमी (रॉड) काढली आणि कृष्णकुमारच्या डोक्यावर जोरदार घाव घातला. घाव इतका भयंकर होता की कृष्णकुमारचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने रितीकने टॉमी जवळच असलेल्या चिरेखाणाच्या पाण्यात फेकून दिली आणि घटनास्थळावरून पळ काढला.

पाण्यात आढळला मृतदेह

नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी देवगड तालुक्यातील तळेबाजार येथून चिरेखाणीवर कामासाठी पोहोचलेल्या मुकादम विजय शेंडगेंना तेथे काम करणारे कृष्णकुमार यादव आणि रितिक यादव हे दोघे दृष्टीस न पडल्यामुळे त्यांनी इतर कामगारांच्या मदतीने शोधाशोध सुरू केली. शोध घेत असताना, चिरेखाणीच्या पाण्यात कृष्णकुमार याचा मृतदेह आढळून आला आणि या धक्कादायक दृश्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. मात्र त्याचा चुलत भाऊ रितिक यादव कुठेही दिसून आला नाही. काही वेळाने रितिक यादव तळेबाजार बाजारपेठेच्या परिसरात दिसून आल्याची माहिती मिळताच मुकादम शेंडगे यांनी प्रसंगावधान बाळगून त्याला थांबवले व घटनेची संपूर्ण माहिती तात्काळ देवगड पोलिसांना दिली.

आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

यासोबतच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शेंडगेंनी देवगडचे पोलीस पाटील पारकर यांनाही याबाबत माहिती दिली. पोलीस पाटील पारकर यांनी ही माहिती तात्काळ देवगड पोलीस स्थानकात कळवली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि याबाबत तपास सुरु केला. दरम्यान, संशयित आरोपी रितेश याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. 

आणखी वाचा 

Parbhani Crime news: चालत्या बसमधून आईने बाहेर फेकलेल्या बाळाचा पोस्टमार्टम अहवाल आला, चिमुकल्याच्या डोक्यावरच मार बसला अन्...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पोटच्या लेकरांना ST बसमध्ये सोडून आईने प्रियकरासोबत ठोकली धूम, बीडमध्ये धक्कादायक घटना, पोलिसांकडून शोध सुरु 
पोटच्या लेकरांना ST बसमध्ये सोडून आईने प्रियकरासोबत ठोकली धूम, बीडमध्ये धक्कादायक घटना, पोलिसांकडून शोध सुरु 
छत्रपती संभाजीनगर हादरलं! पाच वर्षीय गतिमंद मुलाला सावत्र बापाने संपवलं, आईचाही गुन्ह्यात सहभाग
छत्रपती संभाजीनगर हादरलं! पाच वर्षीय गतिमंद मुलाला सावत्र बापाने संपवलं, आईचाही गुन्ह्यात सहभाग
Pune : डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी उपचार करताच रक्ताची उलटी झाली, 6 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप
डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी उपचार करताच रक्ताची उलटी झाली, 6 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप
चोरीचा संशय घेतल्याच्या रागातून मित्रानेच संपवलं मित्राला, धक्कादायक घटनेनं जळगाव हादरलं, आरोपीच्या अटकेसाठी आमदार चंद्रकांत पाटलांचा पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या
चोरीचा संशय घेतल्याच्या रागातून मित्रानेच संपवलं मित्राला, धक्कादायक घटनेनं जळगाव हादरलं, आरोपीच्या अटकेसाठी आमदार चंद्रकांत पाटलांचा पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या

व्हिडीओ

Maharashtra on Petrol Diesel : देशात पुरेसा इंधनसाठा, मग इंधनटंचाई का? Special Report
Rohit Pawar Special Report : पवारांच्या बैठकीत रोहित पवारांची दांडी? राजकीय चर्चांना उधाण
NCP Merger Sharad Pawar Sunetra Pawar : पडदा विलिनीकरणावर लक्ष 'पवार 'नीतीवर Special Report
Rahul Gandhi Sharad Pawar on PM Modi काँग्रेसचे बोल कडवे,पवारांनी गायले गोडवे Special Report
PM Modi meets Italian PM Meloni : मोदी,मेलोनी आणि मेलोडी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Re-Exam : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची उच्चस्तरीय सुरक्षा बैठक; फेक टेलिग्राम चॅनेल्सवर कारवाईचे आदेश
NEET : फेक टेलिग्राम चॅनेल्सवर होणार मोठी कारवाई, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे कडक निर्देश
छत्रपती संभाजीनगर हादरलं! पाच वर्षीय गतिमंद मुलाला सावत्र बापाने संपवलं, आईचाही गुन्ह्यात सहभाग
छत्रपती संभाजीनगर हादरलं! पाच वर्षीय गतिमंद मुलाला सावत्र बापाने संपवलं, आईचाही गुन्ह्यात सहभाग
Giorgia Meloni : 'परिश्रम ही सफलता की कुंजी'; मोदींसमोर हिंदीत बोलल्या जॉर्जिया मेलोनी, व्हिडीओ व्हायरल
'परिश्रम ही सफलता की कुंजी'; मोदींसमोर हिंदीत बोलल्या जॉर्जिया मेलोनी, व्हिडीओ व्हायरल
Ladki Bahin Yojana : मार्च एप्रिलच्या हप्त्याच्या 3000 रुपयांची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, महत्त्वाचा शासन निर्णय जारी
मार्च एप्रिलच्या हप्त्याच्या 3000 रुपयांची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, महत्त्वाचा शासन निर्णय जारी
EPFO : 7 कोटी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, यूपीआयद्वारे पीएफचे पैसे काढण्याची चाचणी यशस्वी, मनसुख मांडवीय यांच्याकडून मोठी अपडेट 
यूपीआयद्वारे पीएफचे पैसे काढण्याची चाचणी यशस्वी, मनसुख मांडवीय यांच्याकडून मोठी अपडेट 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 मे 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 मे 2026 | बुधवार
बाॅयफ्रेंडसोबत राहायचं म्हणून गर्लफ्रेंडनं 1.66 कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, तीन दिवस लपले; चौथ्या दिवशी गर्लफ्रेंड हॉटेलमध्ये अंघोळीला जाताच तोच गुजराती बाॅयफ्रेंड चोरलेल्या दागिन्यांसह फरार
बाॅयफ्रेंडसोबत राहायचं म्हणून गर्लफ्रेंडनं 1.66 कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, तीन दिवस लपले; चौथ्या दिवशी गर्लफ्रेंड हॉटेलमध्ये अंघोळीला जाताच तोच गुजराती बाॅयफ्रेंड चोरलेल्या दागिन्यांसह फरार
BAN vs PAK : बांगलादेशकडून कसोटी मालिकेत पाकिस्तानला व्हाईट वॉश, पाकिस्तानचा पराभव आणि भारताला WTC मध्ये मोठा धक्का
बांगलादेशसमोर पाकिस्तानचा दोन्ही कसोटीत पराभव, इकडे टीम इंडियाला मोठा धक्का, काय घडलं?
Embed widget