Nashik NEET Paper Leak: देशभरातील वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी नीट (NEET) परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाची व्याप्ती दिवसागणिक वाढत असल्याचे चित्र आहे. अशातच, नीट परीक्षा पेपर फुटीनंतर (NEET Paper Leak Crime Case) राज्यात देखील कारवाई सुरू झाली असून, याप्रकरणातीलआरोपी शुभम खैरनारच्याचौकशीतत्याचाआणखीकाही नवे कारनामे समोर आलेआहे.  (NEET Paper Leak Crime Case)

Continues below advertisement

180 पेक्षा जास्त विद्यापीठात प्रवेश मिळवून देण्याचे दावे, स्वतःच्या नावासमोर डॉक्टर असा उल्लेख

दरम्यान, वैद्यकीय प्रवेश मार्गदर्शनासाठी शुभम खैरनार प्रतिविद्यार्थी 11 ते 45 लाख उकळत असल्याची माहिती समोरआलीआहे. यात 180 पेक्षा जास्त विद्यापीठात प्रवेश मिळवून देण्याचे शुभम खैरनार दावे करत होता. 2021 मध्ये संशयित शुभम खैरनार मध्य प्रदेशातील सिहोर येथे एका विद्यापीठात होता. मात्र प्रवेशानंतर तो एकदाही विद्यापीठात उपस्थित राहिला नसल्याची माहिती तपासातपुढेआलीआहे. शिक्षण पूर्ण नसताना किंबहुना पदवी संपादित नसतानाही स्वतःच्या नावासमोर शुभम खैरनार डॉक्टर असा उल्लेख करत होता. शुभम खैरनार हा त्याच्या स्वतःच्या वैद्यकीय मार्गदर्शन केंद्राची अशा पद्धतीने प्रसिद्धी करीत असल्याचेही बोललंजातआहे.

Continues below advertisement

राज्यासह भोपाल आणि बेंगळुरुमध्ये करिअर समुपदेशन केंद्र (NEET Paper Leak Crime Case)

दरम्यान, 5 जू 2024 रोजी एसआर एज्युकेशन कन्सल्टन्सी नावाने संशयिताची पहिली पोस्ट प्रसिद्धकरण्यातआली. यात नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नागपूर, भोपाल आणि बेंगळुरुमध्ये करिअर समुपदेशन करण्यातआलं. यात एमबीबीएस, बीएएमएस, बीयूएमएस, बीएचएमएस, बीएनव्हायएस, बीडीएससह फार्मसीसाठी प्रवेश देण्याचादावाकरण्यातआला. व्यवस्थापन प्रवेश, पॅरामेडिकल प्रवेशाकरिता कार्यरत असून नीट आणि जेईई परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे समुपदेशन केल्याचंबोललंजातहोतं. तसेच व्यवस्थापन प्रवेश, पॅरामेडिकल प्रवेशाकरिता देखील कार्यरत असल्याचादावायातूनकरण्यातआला.

NEET Paper Crime Case :  भारतासह परदेशातही वैद्यकीय प्रवेशाच्या खात्रीचे दावे

किंबहुना भारतासह परदेशातही वैद्यकीय प्रवेशाच्या खात्रीचे दावे करत, नीट आणि जेईई परीक्षेची अर्ज नोंदणी, प्रवेश प्रक्रियेसह मार्गदर्शनाचे दावेहीखैरनारकरतअसल्याचीधक्कादायकमाहितीतपासातूनपुढेआलीआहे. परिणामीपोलिसांनीया प्रकरणीअधिकमाहितीतपासूनत्यादिशेनेतपाससुरुकरण्यातआलाआहे.

नाशिकच्या नामांकित कॅनडा कॉर्नर परिसरात नीट पेपर फुटी प्रकरणातील संशयित आरोपी शुभम खैरनारचे वैद्यकीय प्रवेश आणि मार्गदर्शन केंद्र आहे. तो गेल्या दोन ते तीन वर्षांपासून ह्या एस आर एज्युकेशन कन्सल्टन्सी कार्यालयामध्ये विद्यार्थ्यांना ऍडमिशन प्रोसेस मार्गदर्शन आणि संपूर्ण मॅनेजमेंट आणि इतर वैद्यकीय प्रवेशासाठी प्रक्रिया करून देत होता. या कार्यालयातून त्याचा नेमकं काय काम सुरू होतं कोण कोणत्या विद्यार्थ्यांना त्यांनी या वैद्यकीय मार्गदर्शन केंद्रातून प्रवेश मिळून दिला आणि त्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने हा प्रवेश वैद्यकीय क्षेत्रात मिळाला याची सखोल चौकशी आता तपासणी करण्याच्या माध्यमातून देखील केली जाणार असल्याची माहिती आहे एकूणच या प्रकरणात शुभम खैरनार याच्या कार्यालयातील नेमकं काय कामकाज सुरू होता यातून देखील अनेक नीट पेपर फुटी प्रकरणातील महत्त्वाचे खुलासे होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

इतरमहत्वाच्याबातम्या