Pune: पुण्यातील स्वारगेट एसटी स्टँडमध्ये उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी दत्ता गाडे  (Datta Gade) याला आज पुणे सत्र न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. गाडे याचे वकील सुमित पोटे यांनी याप्रकरणातील पीडित तरुणीला आरोपीने 7500 रुपये दिले, अशी माहिती न्यायालयात दिलीच नव्हती अशी कबुली आज त्याने दिलीच नसल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी केलीय. त्यामुळे आता या प्रकरणाला मोठा ट्विस्ट आला आहे.या प्रकरणाच्या पहिल्या सुनावणीवेळी,पोटे यांनी मात्र माध्यमांशी बोलताना आरोपीने पीडित तरुणीला पैसे दिले होते अशी माहिती दिल्याने एकच खळबळ उडाली होती. (Swargate Bus Depot Crime)

वकिलांची माध्यमांसमोर सारवासारव

आज सुनावणीनंतर आरोपीच्या वकिलांनी माध्यमांशी बोलताना 7500 रुपयांचा कुठलाही युक्तिवाद न्यायालयासमोर झालाच नसल्याची कबुली दिली. कोर्टासमोर युक्तिवाद संपल्यावर आरोपी गाडे याने ही माहिती आम्हाला दिली होती आणि त्यावरूनच आम्ही माध्यमांशी बोललो अशी सारवासारव दत्ता गाडेच्या वकील पोटे यांनी केली. एक वकील म्हणून असं बेजबाबदार वक्तव्य करणं संयुक्तिक आहे का? असा प्रश्न माध्यमांनी त्यांना आज विचारला असता त्यांनी उत्तर देण्याचं टाळून तिथून काढता पाय घेतला.  या प्रकरणी सविस्तर माहिती पत्रकार परिषद घेऊन प्रश्नांची उत्तरे देऊ असं सांगितलं.यामुळे 7500 रुपयाचा विषय न्यायालयासमोर युक्तिवाद न करता माध्यमांना हाताशी धरून समाजात खोटी माहिती देणाऱ्या या वकिलांवर पोलीस कारवाई करणार का? असा प्रश्न आता उभा राहिला आहे.

स्वारगेट अत्याचार घटनेनंंतर दत्ता गाडेचा दावा

स्वारगेट बस स्थानकामधील महिला अत्याचाराच्या घटनेनं राज्य हादरलं असून चक्क एसटी बसमध्ये (Bus) महिलेवर बलात्कार झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली. त्यानंतर, विरोधकांकडून आणि माध्यमांकडून झालेल्या टीकेनंतर सरकारने तत्काळ पाऊले उचलत घटनेची गंभीर दखल घेतली. पोलिसांनी आरोपी दत्ता गाडे याला एका गावातून अटक केली. मात्र, आरोपीच्या अटकेनंतर त्याच्या वकिलांनी दिलेल्या वक्तव्यानंतर पीडित मुलीकडेच संशयाच्या नजरेतून पाहण्यात येऊ लागले. त्यातच, सोशल मीडियावर देखील विविध चर्चांना उधाण आले. पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकावर उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर मंगळवारी 25 फेबुवारी रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास बलात्कार झाला. या घटनेनंतर समाजातून आणि समाजमाध्यमातून संताप व्यक्त करण्यात आला. मी संबंधित तरुणीवर कुठलीही बळजबरी केली नाही. तिनेच मला बोलावले आणि आम्ही बसमध्ये गेलो. तिने माझ्याकडून साडेसात हजार रुपये घेतले. तसेच, त्या ठिकाणी तरुणीचा एक एजंटही (Agent) उपस्थित होता. पिडीत तरुणीवर बलात्कार झालाच नाही. दोघांमध्ये जे घडले ते संमतीने झाले, असा दावा दत्तात्रय गाडे याच्या वकिलांनी केला होता. आता असे काहीच घडले नसल्याचं वकील म्हणू लागलेत त्यामुळे घटनेला वेगळेच वळण आले आहे.

हेही वाचा: