Ulhasnagar: उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे अवघ्या काही हजारांच्या मोबाईल चोरीच्या उद्देशाने भर रस्त्यात दुचाकीवर आलेल्या दोघांनी एकाची तीक्ष्ण हत्याराने हत्या केली आहे. मुन्‍नीलाल जस्वार, असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हल्ल्याचा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. 

मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर कॅम्प नंबर 3 च्या ओटी सेक्शन भागात ही घटना घडली आहे. मुन्‍नीलाल हे 9 एप्रिलला पहाटे प्रातविधी करून घरी येत होते. याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी मुन्नीलाल यांच्या हातातील मोबाईल हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र मुन्नीलाल यांनी त्याला विरोध केल्याने हल्लेखोरांनी त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असतांना 11 एप्रिलला मुन्नीलाल यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. 

सुरुवातीला उल्हासनगर मध्यवर्ती पोलिसांनी याप्रकरणी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र मुन्नीलाल यांचा रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही आपल्या ताब्यात घेऊन तपास सुरू केला होता. यासाठी विविध तीन पथक आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली होती. अखेर मध्यवर्ती पोलिसांनी आरोपी गौतम झा आणि अजय शिरसाठ या दोघांना अटक केली आहे. त्यांनी हत्येची कबुली दिली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान अवघ्या काही हजारांच्या मोबाईलसाठी मुन्‍नीलालचा जीव गेल्याने तो राहत असलेल्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

शहरी नक्षलवाद प्रकरणातील आरोपी आणि प्रसिद्ध तेलगु कवी वरवरा राव यांना जामीन देण्यास हायकोर्टाचा नकारElectricity : शाळांच्या तोडलेल्या वीज जोडण्या पुन्हा सुरू कराव्यात, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडChandrakant Patil : हिंदुत्व हा भाजपाचा श्वास, चंद्रकांत पाटील यांचं प्रत्युत्तरMaharashtra Corona Update : राज्यात बुधवारी 124 रुग्णांची नोंद तर 113 कोरोनामुक्तLatur : भीमजयंतीनिमित्त लातुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 70 फुटी भव्य पुतळा

 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha