Shivraj Motegaonkar NEET Exam 2026 Paper Leak: कुलकर्णी आणि मांढरेने प्रश्न पाठ केले, मग हाताने लिहिले; नीटच्या पेपरफुटीची मोडस ऑपरेंडी, सगळ्यात मोठी माहिती
Shivraj Motegaonkar NEET Exam 2026 Paper Leak: वर्षानुवर्षे अध्यापनाचे काम केल्याने पीव्ही कुलकर्णीने केमिस्ट्रीच्या तर मनीषा मांढरेने बायोलॉजीच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न तोंडपाठ केले.

Shivraj Motegaonkar NEET Exam 2026 Paper Leak: नीटच्या पेपर फुटीचा (NEET Exam 2026 Paper Leak) कट शिवराज मोटेगावकरने (Shivraj Motegaonkar) त्याच्या साथीदारांना हाताशी धरुन अतिशय सुनियोजितपणे आखल्याचं सीबीआयच्या तपासात समोर येत आहे. त्यासाठी मोटेगावकरने सर्वात आधी त्याच्या क्लासमधे काम करणार्या पीव्ही कुलकर्णीची एनटीएच्या प्रश्नपत्रिका सेट करणार्या पॅनलवर वर्णी लावून घेतली. सोबत मनीषा मांढरे (Manisha Mandhare) हीची देखील NTA च्या पॅनलवर वर्णी लावण्यात आली. कुलकर्णी केमिस्ट्री आणि मांढरे बायॉलॉजीच्या प्रश्नपत्रिका फोडणार आणि त्या मोटेगावकरपर्यंत पोहोच करणार अशी सोय करण्यात आली.
वर्षानुवर्षे अध्यापनाचे काम केल्याने पीव्ही कुलकर्णीने केमिस्ट्रीच्या तर मनीषा मांढरेने बायोलॉजीच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न तोंडपाठ केले. NTA मध्ये प्रश्नपत्रिका तयार करतानाच त्यांनी त्या प्रश्नपत्रिकांमधील प्रश्न तोंडपाठ केले. त्यानंतर ते हाताने लिहून काढून मोटेगावकरला पाठवले. मोटेगावकरने ते पीडीएफच्या स्वरुपात स्वत:च्या मोबाईलमधे सेव्ह करुन ठेवले आणि पुढे पैशांच्या बदल्यात त्यांची विक्री केली. 3 मे रोजी परिक्षा पार पडल्यावर मोटेगावकरने मोबाईलमधून ते डिलीट करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र सीबीआयने मोबाईलमधील डेटा रिकव्हर केला आणि मोटेगावकरला अटक झाली.
लातूरमध्ये मोटेगावकरनी बेकायदेशीररित्या आठ भूखंड खरेदी केल्याची धक्कादायक माहिती- (Shivraj Motegaonkar NEET Exam 2026 Paper Leak)
नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शिवराज मोटेगावकरांचे नवनवे कारनामे आता समोर येऊ लागले आहेत. लातूरमध्ये मोटेगावकरनी बेकायदेशीररित्या आठ भूखंड खरेदी केल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. साडेसहा कोटींची मालमत्ता केवळ पावती तिकिटावर खरेदी केल्याची धक्कादायक माहिती आहे. अनिल कुमार अग्रवाल यांच्याकडून जमीन खरेदी करण्यात आली. पैसे कसे दिले याबाबत कोणतीही माहिती खरेदी पत्रावर नाही. माहिती अधिकार कार्यकर्ते मल्लिकार्जुन भाईकट्टी यांनी हा सर्व प्रकार समोर आणला. मात्र अनेक वर्षापासून याबाबतचा पाठपुरावा करुन देखील राजकीय हस्तक्षेपामुळे यावर त्या त्यावेळी निर्णय झालेला नाही. उद्योग भवन परिसरात जागा विक्री करता येत नाही. हस्तांतरित होत नाही, असे असतानाही शिवराज मोटेगावकरने या ठिकाणी आठ प्लॉट खरेदी केले. बेकायदेशीर भूखंडाला मनपाचं संरक्षण असल्याचं चित्र आहे. संस्थेच्या पातळीवर कागदपत्रांची पूर्तता झाली असली तरी प्रशासनाच्या पातळीवर त्याला कसलीही कायदेशीर मान्यता नाही. हे आठ भूखंड विकत घेतल्यानंतर त्यावरील लाईट बिल, बांधकाम परवाने हे शिवराज मोटेगावकर यांच्या नावे देण्याचा प्रकार महानगरपालिकेकडून करण्यात आलाय.
मोठ्या रकमांचे व्यवहार, बँक खाते आणि दलालांशी असलेले आर्थिक कनेक्शन तपासाच्या केंद्रस्थानी- (NEET Exam 2026 Paper Leak)
नीट पेपरफुटी प्रकरणात आता नाशिकमधील नामांकित क्लासेस आणि शिक्षण संस्था सीबीआयच्या रडारवर आहेत. शुभम खैरनारच्या चौकशीतून काही खासगी क्लासेस आणि संस्थांची नावे समोर आल्याची चर्चा आहे. संशयित क्लासेस आणि शिक्षण संस्थांना सीबीआयकडून नोटिसा जारी झाल्याची सूत्रांची माहिती आहे. चौकशीत सहकार्य करण्याचे आदेश, कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी होणार आहे. शुभम खैरनार आणि क्लास चालकांमधील थेट संबंधांचा तपास सुरू असून विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका किंवा उत्तरे पुरवली गेली का, याचाही शोध घेण्यात येत आहे. मोठ्या रकमांचे व्यवहार, बँक खाते आणि दलालांशी असलेले आर्थिक कनेक्शन तपासाच्या केंद्रस्थानी आहेत. सीबीआयकडून क्लासेस आणि संस्थांवर छापेमारीची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे रेकॉर्ड, फी व्यवहार आणि डिजिटल पुरावे जप्त होण्याची शक्यता आहे.
कुलकर्णी, मांढरे पेपर फोडून मोटेगावकरकडे पोहोचवणार अशी सोय, VIDEO:
संबंधित बातमी:
Before You Go
Pune Hospital Bomb Case:यूट्यूब पाहून बनवला बॉम्ब;हॉस्पिटलला लुटण्याचा होता प्लॅन,पोलिसांचा मोठा खुलासा!





















