बीड : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) यांच्या हत्याप्रकरणानंतर बीड (Beed) जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण प्रचंड ढवळून निघाले आहे. दरम्यान,सरपंच देशमुख यांच्या हत्येनंतर जिल्ह्यातून अनेक गुन्हेगारीच्या घटनाही आता उजेडात येऊ लागल्या आहेत. अशातच पुण्यातील सीआयडी (CID) कार्यालयात 31 डिसेंबर रोजी वाल्मिक कराडला (Walmik karad) आपल्या स्वतःच्या स्कॉर्पिओ गाडीत ड्रॉप करणारा शिवलिंग मोराळे (Shivling Morale) चर्चेत आला होता. त्यानंतर त्याच्या अडचणीत वाढ झाली. आता शिवलिंग मोराळेच्या (Shivling Morale) वडिलांचा प्रताप ही समोर आला असून ड्राय डेच्या दिवशी शिवलिंग मोराळे याचे वडील पांडुरंग मोराळे हे देशी दारू विक्री करताना पकडले गेले आहेत.
बियर बारमधूनच दारू विक्री? कारवाईच्या भीतीने जागा बदलल्याची चर्चा
पुढे आलेल्या माहितीनुसार, शिवलिंग मोराळे याचे वडील पांडुरंग मोराळे यांच्यासह आणखी एका तरुणावर नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. शिवलिंग मोराळेचे बीड तालुक्यात अनेक बियर बार आहेत. अशातच 26 जानेवारी रोजी ड्राय डे असताना निवडुंगवाडी परिसरात बिअर बारच्या मागे देशी दारू विक्री करताना त्याचे वडील पांडुरंग मोराळे आणि सचिन बुकतुरे हे दोघे आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडील दारू जप्त करून या दोघांना ताब्यात घेतले. मात्र ही दारू बियर बार मधूनच विक्री केली जात होती. परंतु लायसन रद्द होण्याच्या भीतीने पोलिसांच्या माध्यमातून या कारवाईची जागा बदलल्याची चर्चा सुरू आहे.
वाल्मिक कराडची ऑडिओ क्लीप व्हायरल,अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता
दरम्यान, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर खंडणी प्रकरणात व मकोका अंतर्गत अटक करण्यात आलेल्या वाल्मिक कराड आणि एका महिला पोलीस अधिकारी यांच्यातील फोनवरील संभाषणाचा कथित ऑडिओ व्हायरल झाला आहे. बीडमधील सायबर सेलच्या निशिगंधा खुळे आणि वाल्मिक कराड यांच्यातील हे संभाषण असल्याचे बोललं जात आहे. या व्हायरल क्लीपमुळे आता वाल्मिक कराड पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात या प्रकरणी नेमकी काय पाऊले उचलली जातात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या