Shirdi Crime : एकीकडे शिर्डीत रामनवमीच्या उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे शिर्डीत दोघांची निर्घुण हत्या करण्यात आली आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. शिर्डी विमानतळाजवळील काकडी शिवारातील गुंजाळवस्तीवर ही घटना घडली आहे. दरोड्याच्या उद्देशाने हल्ला करत हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डी विमानतळाजवळील काकडी शिवारातील गुंजाळवस्ती येथे दोघांची निघृण हत्या तर एक जण गंभीर जखमी आहे. दरोड्याच्या उद्देशाने हल्ला करत हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे.
घरातील सामानाची उचकापाचक
मृतात वडील व मुलाचा समावेश आहे तर आई गंभीर जखमी झाली आहे. साहेबराव भोसले (60) व कृष्णा भोसले (30) अशी मृतांची नावे आहेत. तर घरातील सामानाची उचकापाचक झाल्याचे देखील समजते. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र, दोघांच्या हत्येमुळे शिर्डीत एकच खळबळ उडाली आहे.
मुळा कालव्यात बालकाचा बुडून मृत्यू
दरम्यान, राहुरी तालुक्यातील मुळा धरणाच्या डाव्या कालव्याजवळून बहिणीबरोबर दुकानात जात असताना सहा वर्षाच्या बालकाचा पाय घसरून कालव्यात पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील ढोकरवाडी लगत असलेल्या मुळा धरणाच्या डाव्या कालव्याजवळून मोठ्या बहिणीबरोबर दुकानात खाऊ आणण्यासाठी जात असताना बाजूला असलेल्या कालव्यात पाय घसरून पडल्याने जय नवनाथ पवार (वय ६) या बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. जय पवार हा जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी असून त्याचे आई-वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदारनिर्वाह करतात. जय हा आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. त्याला दोन बहिणी आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या