Nagpur News नागपूर : महत्वाकांशी ब्रह्मोस मिसाइल प्रकरणात (BrahMos Missile Case) वैज्ञानिक निशांत अग्रवाल याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. निशांत अग्रवाल यांनी काही संवेदनशील माहिती शत्रूंना पाठवल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला होता. अखेर नागपूरच्या (Nagpur News) अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम.व्ही.देशपांडे यांनी या प्रकरणाचा निकाल देत आज निशांत अग्रवाल या शास्त्रज्ञाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.


8 ऑक्टोबर 2018 रोजी यूपी आणि महाराष्ट्र एटीएसने संयुक्तरीत्या नागपुरातील उज्वल नगर परिसरात निशांत अग्रवाल याच्या घरावर धाड टाकत त्यांना अटक केली होती. त्यांच्या विरोधात शासकीय गोपनीयतेच्या कायद्याचा भंग केल्याचा आरोप होता. तर निशांत अग्रवाल वैज्ञानिक म्हणून नागपूर जिल्ह्यातील ब्रह्मोस मिसाइलच्या निर्मितीशी संबंधित कंपनी मध्ये कार्यरत होते.


संवेदनशील माहिती शत्रूंना पुरवल्याचा होता ठपका 


दरम्यान, कार्यालयातील संगणकातील अत्यंत गोपनीय माहिती त्यांनी त्यांच्या घरातील संगणकात ठेवली होती. कालांतराने ही माहिती त्यांनी शत्रूला पुरवल्याचा संशय एटीएसला होता. परिणामी, त्या आधारेच 8 ऑक्टोबर 2018 रोजी युपी आणि महाराष्ट्र एटीएस ने संयुक्त कारवाई करत निशांत अग्रवाल यांना अटक केली होती. त्याच प्रकरणी आज निशांत अग्रवाल यांना दोषी मानून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.


नागपुरातील उज्वलनगर भागात निशांत अग्रवाल हे किरायाने राहात होते. तर ते नागपूर जिल्ह्यातील ब्रह्मोस मिसाइलच्या निर्मितीशी संबंधित कंपनी मध्ये सीनियर सिस्टिम इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. दरम्यान, निशांत हनी ट्रॅपमध्ये फसून हेरगिरी करत असल्याचा संशय उत्तर प्रदेश आणि  महाराष्ट्र एटीएसला होता. तसेच त्यांनी कार्यालयातील संगणकातील अत्यंत गोपनीय माहिती त्यांनी त्यांच्या घरातील संगणकात ठेवली होती आणि कालांतराने ही माहिती शत्रूला पुरवल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला होता.


अतिरिक्त सत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय 


पुढे तपासाचे चक्र अधिक गतिमान होत झालेल्या चौकशी अंती निशांत अग्रवाल यांना दोषी ठरवण्यात आले आहे.या कारवाईत पोलिसांनी जप्त केलेला एक डेल कंपनीचा लॅपटॉप, एक एच.पी. कंपनीचा लॅपटॉप, हार्ड-डिस्क (डब्ल्यूबी कंपनी) एक ॲपल आय-फोन मोबाइल, एक नोकिया कंपनीचा मोबाइल, एक रेड-मी कंपनीचा मोबाइल, राउटर आणि एक ब्रम्होस लॅपटॉप आयटीच्या तरतुदींनुसार विल्हेवाट लावला जाईल, असे आदेशही न्यायालयाने दिले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या