Satara Crime News : सातारा (Satara) जिल्ह्यातील कोरेगावमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. तालुक्यातील जयपूर येथे जमिनीच्या वादातून एकावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. यामुळं जयपूर गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. यामध्ये सोमनाथ निकम हे गंभीर जखमी झाले आहेत. पैलवान सचिन शेलार यांनी वार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पैलवान सचिन शेलार यांच्या हातात रक्ताने माखलेला कोयता होता.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार जमिनीच्या वादातून हा हल्ला झाल्याची माहिती आहे. यामध्ये जखमी झालेल्या सोमनाथ निकम यांना साताऱ्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर रहिमतपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, या घटनेसंदर्भातील तपास पोलिसांनी सुरु केला आहे.
महत्वाच्या बातम्या: