Satara Crime : सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात किरकोळ अपघातानंतर 12 जणांनी वाहनचालकाला नुकसान भरपाई दे म्हणत बेदम मारहाण केली . या मारहाणीत  वाहनचालकाचा जागीच मृत्यू झाला . या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून महिना उलटूनही सर्व आरोपी अजून मोकाट फिरत असल्याने तीव्र संताप व्यक्त होतोय . मृत वाहन चालकाच्या कुटुंबीयांनी आक्रमक पवित्रा घेतला असून मारहाण करणाऱ्या सर्व आरोपींना अटक झाली नाही तर पोलीस स्टेशन समोर उपोषणाला बसणार असा इशाराही त्यांनी दिलाय . (crime news )

Continues below advertisement

नेमकं प्रकरण काय ?

ही घटना बनपुरी येथे घडली. एका चारचाकी वाहनाचा किरकोळ अपघात झाला होता. अपघातानंतर झालेल्या वादातून वाहनचालकाला १२ जणांनी मिळून अमानुष मारहाण केली. या मारहाणीत चालकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणात पोलिसांनी काही आरोपींना अटक केली असली, तरी सर्व आरोपी अजूनही अटकेबाहेर असल्याचा आरोप मृत चालक संजय कचरे यांच्या नातेवाइकांनी केला आहे.

या घटनेनंतर लोकप्रतिनिधी रवींद्र दंगेकर, लोणार समाजाच्या शिष्टमंडळाने संबंधित पोलीस ठाण्यावर धडक देत निष्क्रीय तपासाविरोधात नाराजी व्यक्त केली. पोलिसांकडून या प्रकरणात तपासात दिरंगाई केली जात असून, न्याय मिळवण्यासाठी आम्हाला आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागत आहे, असे मत कचरे कुटुंबीयांनी व्यक्त केले. संजय कचरे यांच्या कुटुंबाने स्पष्ट इशारा दिला आहे की, जर लवकरात लवकर सर्व आरोपींना अटक झाली नाही, तर लोणार समाज आणि कचरे कुटुंबीय पोलीस स्टेशनसमोर आमरण उपोषणाला बसणार आहेत.

Continues below advertisement

नर्सिंग कोर्स करणाऱ्या 16 वर्षीय तरुणीवर अत्याचार

मालेगावातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये नर्सिंग कोर्सच्या माध्यमातून प्रॅक्टिस करणाऱ्या एका 16 वर्षीय तरुणीवर हॉस्पिटलमधीलच एकाने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक प्रकार उजेडात आला आहे. मोहम्मद अथर खुर्शिद अहमद याने हा लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना 13 जुलैला पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास घडली आहे. मोहम्मद अथर खुर्शिद अहमद याने या नर्सिंग कोर्स करणाऱ्या पीडितेला एक फोटो दाखवत ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत तिच्यावर बळजबरीने अत्याचार केलाय. घडलेल्या प्रकाराबाबत पीडितेने मैत्रिणीकडे व कुटुंबियांकडे वाच्यता केली असता हा प्रकार उजेडात आला आहे. यानंतर या प्रकरणी  पीडित तरुणीने छावणी पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला.

हेही वाचा:

Malegaon Crime News : खळबळजनक! मालेगावातील नामांकित हॉस्पिटलमध्ये नर्सिंग कोर्स करणाऱ्या 16 वर्षीय तरुणीवर अत्याचार; पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल