Chhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजी नगरच्या वाळूजमध्ये संतोष लड्डा या उद्योगपतीच्या घरावर पडलेल्या सर्वात मोठ्या दरोड्याच्या घटनेत खळबळ जनक अपडेट समोर आला आहे . संतोष लड्डा यांच्या घरी दरोडा टाकून एन्काऊंटर झालेल्या अमोल खोतकरने दिलेलं 22 तोळे सोनं त्याची बहीण रोहिणी खोतकर हिनं घरासमोरच्या तुळशी वृंदावनात लपवून ठेवल्याची माहिती समोर आली आहे . शिवाय कुंडीत तिने जिवंत काडतुसंही लपवून ठेवली होती . (Santosh ladda ) Abp माझाच्या एक्सक्लुझिव्ह रिपोर्टमध्ये नक्की काय झालं ? नेमकं प्रकरण काय ? पाहुया ...

तुळशी वृंदावनात 22 तोळे सोनं अन् जिवंत काडतुसं ..

छत्रपती संभाजी नगरच्या वाळूज मधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या निवासस्थानी 15 मे रोजी मोठा दरोडा पडला होता . एन्काऊंटर झालेल्या संशयीत आरोपी अमोल खोतकरच्या बहिणीला मंगळवारी (24 जून ) पोलिसांनी अटक केली . रोहिणी खोतकरच्या घराची झडती घेतल्यानंतर पोलिसांना 22 तोळे सोनं आणि 7 जिवंत काडतुसं सापडली होती . संतोष लड्डा यांच्या घरी दरोडा टाकून अमोल खोतकरने दिलेलं सोनं रोहिणी खोतकरने तुळशी वृंदावनात लपवून ठेवलं होतं .याशिवाय कुंडीत जिवंत काढत असे पुरून ठेवल्याचंही समोर आलं .

पोलिसांना सोनं सापडलं कसं ?

रोहिणी खोतकरच्या घरी झडती घेताना पोलिसांच्या तपासात काही कुंड्या ओल्या दिसल्या .तर काही कुंड्यांमध्ये पाणी घातलेलं नाही हे पोलिसांच्या लक्षात आलं . त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला . त्यानंतर  पोलिसांनी कुंड्या तपासल्या .यात एका कुंडीत चार जिवंत काडतुसे तर दुसऱ्या कुंडीत तीन जिवंत काडतुसे सापडली . कुंडनमध्ये जिवंत काढ तुझं सापडल्यामुळे तुळशी वृंदावनही पोलिसांनी तपासलं .या तुळशी वृंदावनात 22 तोळे सोन पुरून ठेवल्याचे समोर आलं . पोलिसांना 22 तोळे सोनं शोधण्यात यश आला असलं तरी अदयाप पावणेचार किलो सोनं शोधणं ही पोलिसांसमोर आव्हान असणार आहे . 

7 जिवंत काढत असे मातीत पुरून ठेवली ..

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रोहिणी खोतकर च्या घरात सापडलेली जिवंत काडतुसे ही अमोल खोतकरचीच आहेत . याच अमोल खोतकर कडे दोन पिस्तुले होती .ज्यातील एका पिस्तुलातून त्याने पोलिसांवर गोळीबार केल्यानं अमोल खोतकरचा एन्काऊंटर करण्यात आला होता .संतोष लड्डा या वाळूजच्या उद्योजकाच्या निवासस्थानी 15 मे रोजी पडलेल्या दरोड्यात साडेपाच किलो सोनं, 32 किलो चांदी आणि 70000 रुपयांचा मुद्देमाल चोरी झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता .