Sangli Crime News : अनैतिक संबंधात पती अडसर ठरत असल्याने पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीलाचसंपवल्याचीखळबळजनकघटना कवठेमहांकाळ (Kavathe Mahakal Crime) तालुक्यातील करोली( टी )गावात घडलीय. याप्रकरणी पोलिसांनी मयताची पत्नी, तिचा प्रियकर तसेच मयताची दोन्ही मुले या चार जणांवर गुन्हा (Crime News) दाखल केला आहे. भारत इराप्पा कर्पे (वय 58) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. तर पत्नी निलाबाई भारत कर्पे (वय 50) आणि तिचा प्रियकर बाबाजी गोविंद कर्पे (वय 42), मनोज भारत कर्पे ,अनिकेत भारत कर्पे असे संशयित आरोपींची नावे आहेत.
Sangli Crime वडिलांचा मृत्यू दारू पिऊन झाल्याचाखोटाबनावरचला, मात्रसत्यसमोरआलंच
मिळालेल्यामाहितीनुसार, निलाबाई कर्पे आणि बाबाजी कर्पे यांचे अनेक दिवसापासून संबंध होते. दोघांच्या संबंधासाठी भारत कर्पे हे अडथळा ठरत होते. या रागातून 28 मार्च रोजी रात्री नऊच्या सुमारास निलाबाई कर्पे आणि बाबाजी कर्पे यांनी भारत कर्पे यांना काठीने बेदम मारहाण करतकायमचाकाटाकाढला. आपल्या कृत्यांचा कोणालाही सुगावा लागू नये या हेतूने भारत कर्पे यांचा मृतदेह मारुती इराप्पा कर्पे यांच्या घरासमोरील खिडकीस ठिबकच्या पाईपने गळफास घेतलेल्या अवस्थेत अडकून ठेवला. या घटनेची कल्पना मनोज कर्पे व अनिकेत कर्पे या त्यांच्या दोन्ही मुलांना झाली. दोन्ही मुलांनी भारत कर्पे यांचा मृतदेह उतरून कवठेमंकाळ उपजिल्हा रुग्णालयात आणला. वडिलांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत काढून आल्याचे डॉक्टरांच्या पासून लपवून ठेवले, आणि वडिलांचा मृत्यू दारू पिऊन झाला, असंखोटंत्यांनी डॉक्टरांना सांगितले.
Kavathe Mahakal Crime : डॉक्टरांनी विच्छेदन करण्याचा सल्ला दिला, पण...
दरम्यान, डॉक्टरांनी विच्छेदन करण्याचा सल्ला दिला. मात्र त्यांनी तो न ऐकता वडिलांचा मृतदेह करोली (टी) येथे घेऊन गेले. त्यांनतर नातेवाईकांना बोलावून मृतदेह जाळून अंत्यविधी उरकण्यात आला. प्रकरणी पोलिसांनी मयताची पत्नी तिचा प्रियकर व दोन्ही मुलांच्यावर खून करून मृतदेह नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सध्यायाघटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर करीत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी मयताची पत्नी, तिचा प्रियकर तसेच मयताची दोन्ही मुले या चार जणांवर गुन्हा (Crime News) दाखल केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
