Sangli Crime IND vs NZ Final T 20 World Cup: टीम इंडियाने न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करत 2026 चा टी-20 विश्वचषकावर भारतीय संघाचं (Team India Champions T20 World Cup 2026) नाव कोरलंय. या दमदार विजयासह भारताने तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकण्याचा (India Win T20 World Cup 2026) मान मिळवलाय. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात (IND Vs NZ Final) टीम इंडियाने न्यूझीलंडला नमवत केवळ ट्रॉफी जिंकली नाही, तर टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात अनेक नवे विक्रमही रचले आहेत. दरम्यान भारतीय संघाच्या विजयानंतर सांगलीत एक अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. भारताच्या विश्वचषक विजयाला सांगलीत गालबोट लागल्याची घटना घडलीय.
Sangli Crime News : हातात फटाके घेऊन फोडताना दुकानाच्या बोर्डाला आग
टीम इंडियाच्या विजयानंतर जल्लोषाच्या नावाखाली तरुणांनी रस्त्यावर उतरत हुल्लडबाजी केलीय. सांगलीच्या मारुती चौकात तरूणांनी अक्षरशः धिंगाणा घातलाय. यावेळी हातात फटाके घेऊन फोडताना दुकानाच्या बोर्डाला आग लागल्याची घटना घडलीय. तर हि आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाची गाडी अडवून बळजबरीने सायरन वाजवण्यासाठी दमबाजी केल्याचाही प्रकार घडला आहे. या गोंधळात अखेर परिस्थिती पाहून पोलिसांनी जमावाला पांगवले आणि परिसरात शांतता प्रस्थापित केलीय.
Akola Crime : अकोल्यातील हरिहरपेठ भागात दोन समुदायात राडा आणि प्रचंड दगडफेक
दुसरीकडे, अकोल्यातील हरिहरपेठ भागात दोन समुदायात राडा आणि प्रचंड दगडफेक झाल्याचीघटनाघडलीआहे. 'टी-20 विश्वचषकात भारताच्या विजयानंतर फटाके फोडण्यावरून हावादझाल्याचंबोललंजातआहे. अकोल्यातील जुने शहर भागातल्या हरिहरपेठमधील सोनटक्के प्लॉट आणि गाडगेनगर भागात दोन समुदायात जोरदार राडा झालाय. यात दोन्ही बाजूने एकमेकांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आलीय. भारत टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकाचा सामना जिंकल्यानंतर फटाके फोडण्यावरून दोन गटांत झालेल्या वादा नंतर हा राडा झालाय.
Akola Crime News : दोषींना ताब्यात घेण्यासाठी पोलीस 'कोंबिंग ऑपरेशन' राबविणार
मिळालेल्यामाहितीनुसार, अकोला शहरातील हरिहर पेठ भागात रात्री दोन समुदाय एकमेकांसमोर आलेय. अडीच वर्षांपूर्वी या भागात दोनदा दंगल झालीये. भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर फटाके फोडण्यावरून दोन गटात वाद झालाय. त्यानंतर दोन्ही गट आमने-सामने आल्यानंतर मोठ्या प्रमाणात दगडफेक झालीय. यात दोन चार चाकी वाहनांची तोडफोड करण्यात आलीय. या दगडफेकीत दोन ते तीन नागरिक आणि काही पोलीस किरकोळ जखमी झालेयेत. जखमी झालेल्या सारंग गीते या तरुणावर जिल्हा रुग्णाला उपचार सुरूयेत. या घटनेनंतर पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणलीय. सध्या या भागात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय. या दगडफेक प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणालाही ताब्यात घेण्यात आलं नव्हतंय. सकाळी या प्रकरणी दोषी आरोपींवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येणारेय. यासोबतच दोषींना ताब्यात घेण्यासाठी पोलीस 'कोंबिंग ऑपरेशन' राबविणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.
इतर महत्वाच्या बातम्या