एक्स्प्लोर

शॉकींग! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीवर दोघांचा सामूहिक अत्याचार; गुंगीचं औषध देऊन लॉजवर नेलं, नराधमांना अटक

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी मूळची सातारा जिल्ह्यातील असून, सध्या ईश्वरपूर येथे राहून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे.

सांगली : महिलांवरील अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाही. त्यातच, राजधानी दिल्लीतही मुलींवरील अत्याचाराच्या घटनेवरुन संताप व्यक्त करत तरुणाई रस्त्यावर उतरल्याचं दिसून येत आहे. एकीकडे महिला अत्याचाराच्या घटनेवर कडक कारवाईचे आश्वासन दिले जात असताना, दुसरीकडे अत्याचाराच्या घटनांनी समाजमन सुन्न होत आहे. आता, इंजिनिअरिंगचे (Sangli) शिक्षण घेणाऱ्या 20 वर्षीय विद्यार्थिनीला लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर परिसरात उघडकीस आली आहे. शीतपेयातून गुंगीचे औषध पाजून तिच्या इच्छेविरुद्ध दोघांनी अत्याचार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी ईश्वरपूर पोलिसांनी (Police) दोन्ही संशयिताला अटक केली आहे. शार्दुल पाटील (वय २१, रा. रेठरेधरण, ता. वाळवा आणि सचिन पाटील (रा. ईश्वरपूर) असे संशयित आरोपींची नावे आहेत. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी मूळची सातारा जिल्ह्यातील असून, सध्या ईश्वरपूर येथे राहून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. ईश्वरपूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयितांनी तरुणीला ईश्वरपूर-कामेरी रस्त्यावरील एका लॉजवर नेले. तेथे तिला शीतपेयातून गुंगीचे औषध पाजल्याचा आरोप आहे. त्यानंतर दोघांनी तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केल्याचाही आरोप तरुणीने केला आहे. या घटनेनंतर पीडितेने ईश्वरपूर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार संशयितांविरुद्ध सामूहिक बलात्कारासह संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत शार्दुल पाटील याला अटक केली. फरार संशयित प्रथम पाटील याचा शोध सुरू असून, घटनेमागील नेमकी पार्श्वभूमी आणि इतर बाबींचा तपास पोलीस करीत आहेत.

लातूरमध्ये तरुणीवर वार

लातूरमध्येही अशीच धक्कादायक घटना घडली आहे. कॉलेजमधून घरी जात असताना एका अल्पवयीन तरुणीवर तरुणाने हल्ला केला. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रोहित पोहरे असे हल्लेखोराचे नाव आहे, ही घटना भाग्यनगर पोलिस स्टेशन हद्दीत घडली. तरुणी आपल्या मैत्रिणी सोबत जात असताना रोहित पोहरे याने रस्त्यावर अडवत मला तुझ्यासोबत बोलायचे आहे, तू मला का बोलत नाही म्हणून तिच्याकडे विचारणा केली. त्यानंतर आपल्याजवळी खंजिराने तिच्यावर हल्ला केला, जमावाने तत्काळ मध्यस्ती करत तरुणीला रुग्णालयात दाखल केले आणि त्यानंतर आरोपी रोहित याला चोप दिला. तसेच, भाग्यनगर पोलिसांना घटनेची माहिती देत पोलिसांचा ताब्यात दिले, सध्या तरुणीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हेही वाचा

तुकाराम मुंढेंचं FDA दिवाळीपूर्वी अ‍ॅक्शन मोडवर; अकोल्यात 1900 किलो मिठाईचा साठा जप्त, परवानेही निलंबित

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतात सोन्याचे सात हांडे पुरल्याची बतावणी; जालन्यात मांत्रिकासह नऊ जणांना अटक, अघोरी पुजेचं साहित्यही जप्त
शेतात सोन्याचे सात हांडे पुरल्याची बतावणी; जालन्यात मांत्रिकासह नऊ जणांना अटक, अघोरी पुजेचं साहित्यही जप्त
नाशिकमध्ये अमृत भारत एक्स्प्रेसच्या डब्यात कारवाई, 1 कोटी 48 लाखांच्या रोकडसह संशयित व्यक्ती ताब्यात
नाशिकमध्ये अमृत भारत एक्स्प्रेसच्या डब्यात कारवाई, 1 कोटी 48 लाखांच्या रोकडसह संशयित व्यक्ती ताब्यात
Pune Crime News: आळंदीत दिवसाढवळ्या थरार; भरवस्तीत तरुणावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला, घटनेचा व्हिडिओ समोर, नेमकं काय घडलं?
आळंदीत दिवसाढवळ्या थरार; भरवस्तीत तरुणावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला, घटनेचा व्हिडिओ समोर, नेमकं काय घडलं?
Dharashiv Crime News: मोबाईलसाठी पैसे न दिल्याचा राग अन्...; वडील झोपल्याचं पाहून लोखंडी फुकारीनं डोक्यात वार, 29 वर्षीय मुलानं बापाला संपवलं, धाराशिवमधील घटना
मोबाईलसाठी पैसे न दिल्याचा राग अन्...; वडील झोपल्याचं पाहून लोखंडी फुकारीनं डोक्यात वार, 29 वर्षीय मुलानं बापाला संपवलं, धाराशिवमधील घटना
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrakant Patil : बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
Rinku Singh : 43 कोटी वाचवण्यासाठी दोन खेळाडूंना रिलीज करा,रिंकू सिंगला केकेआरचा कॅप्टन करा, माजी क्रिकेटपटूनं फॉर्म्युला सांगितला...
केकेआरनं 'त्या' दोघांना रिलीज करावे, 43 कोटी वाचवावे, रिंकूला कॅप्टन बनवा, सल्ला कोणी दिला?
Mantralaya Clerk Protest : मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
NCP Merger : मोदींना डिलिमिटेशन विधेयक मंजूर करायचंय,15-16 मतांची त्यांना गरज, कदाचित त्यासाठी शरद पवारांच्या 8 खासदारांवर डोळा : पृथ्वीराज चव्हाण
मोदींना डिलिमिटेशन विधेयक मंजूर करायचंय,कदाचित त्यासाठी शरद पवारांच्या 8 खासदारांवर डोळा : पृथ्वीराज चव्हाण
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
NCP Merger: मोठी बातमी ! दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक; राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेला गती, सूत्रांची माहिती
मोठी बातमी ! दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक; राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेला गती, सूत्रांची माहिती
Gold Rate Weekly Update : सोन्याच्या दरातील घसरणीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर IBJA कडून जारी
सोन्याच्या दरातील घसरणीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर IBJA कडून जारी
Embed widget