Sangli Crime Robbery:सांगलीच्या मिरज तालुक्यातील अंकली येथील माजी सरपंच राहुल अनिल पाटील याने विश्रामबाग परिसरात राहणाऱ्या एका बँक व्यवस्थापकाच्या (Bank घरात घरफोडी केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. राहुल पाटील याला अटक केल्यानंतर त्याचा तात्काळ जामिनही मंजूर झाला असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, याप्रकरणाची पोलखोल एलसीबीच्या पथकाने केली असून स्वतःच तपास हाती घेतला आहे. मात्र, गावातील लोकप्रतिधीच अट्टर चोर निघाल्याने पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली आहे. (Maharashtra Crime news)
आरोपी असलेला माजी सरपंच हा भाजप पक्षाशी संबंधित असल्याचं सांगण्यात येते. विश्रामबाग येथील एसटी कॉलनीत अश्विन शिवकुमार पिल्ले यांचे घर आहे. पिल्ले हे राष्ट्रीयकृत बँकेत सहायक व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. 19 ऑगस्ट रोजी त्यांचे बंद घरातून तब्बल सहा लाखांचा मुद्देमाल चोरीला गेला. याची फिर्याद विश्रामबाग पोलिस ठाण्यात दाखल झाली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. एलसीबीच्या पथकानेही तपास सुरू करताच काही सीसीटीव्ही फुटेज हाती लागले. यामध्ये पिल्ले यांच्या घरातील चोर दुसरा तिसरा कोणी नसून माजी सरपंच राहुल पाटील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. पोलीस खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. एलसीबीच्या पथकाने राहुल पाटील याच्याकडून चोरी केलेला मुद्देमालही वसुल केला. त्याला अटक करण्यात आली होती. मात्र, काही वैद्यकीय कारणाने त्याला सध्या जामीनावर सोडण्यात आले आहे.
Sangli news: कवठेमहांकाळ मध्ये मेंढपाळांनी अडवला जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीचा ताफा
कवठेमहांकाळमध्ये मेंढपाळांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीचा ताफा अडवल्याचा प्रकार घडला आहे. मेंढपाळांच्या कळपातील मेंढ्या व बकऱ्या चोरीला जातात पण त्याचा तपास होत नसल्याच्या निषेधार्थ मेंढपाळांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यावर मेंढ्यासह मोर्चा काढला होता. कवठेमहांकाळ पोलीस स्टेशन समोरून जिल्हाधिकाऱ्यांचा ताफा जाताना मेंढपाळांनी ताफ्यासमोर मेंढ्या उभ्या करत मेंढ्यांच्या चोरीचा तपास होत नसल्याची मांडली व्यथा , शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख हरिदास लेंगरे यांनी जिल्हाधिकार्यांसमोर आपली व्यथा मांडली. आतापर्यंत जवळपास 60 मेंढ्या चोरीला गेल्या असून, याबाबत तक्रारी करूनही चोरीच्या घटनांचा तपास होत नसल्याने मेंढपाळांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
आणखी वाचा
