Samrudhi Mahamarg Robbery: समृद्धी महामार्गावरील लूट प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; फिल्मी स्टाईल सापळा रचून 7 आरोपींना ठोकल्या बेड्या, आरोपींची संख्या पोहचली 11वर
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर झालेल्या लूटप्रकरणी प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला बीडमधून बेड्या ठोकल्यानंतर संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी आणखी चार आरोपींना फिल्मी स्टाईलमध्ये ताब्यात घेतले आहे.

Samruddhi Mahamarg Crime News: समृद्धी महामार्गावर झालेल्या लूटप्रकरणी प्रकरणातील (Samrudhi Mahamarg Robbery Case) मुख्य सूत्रधाराला बीडमधून (Beed Crime) बेड्या ठोकल्यानंतर संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी (Ch. Sambhajinagar Rural Police) आणखी चार आरोपींना फिल्मी स्टाईलमध्ये ताब्यात घेतले आहे. रेतीचा हायवा चालवण्यासाठी दहा हजार रुपये देऊ, असे म्हणत आरोपीला सापळ्यात अडकवून ही कारवाई करण्यात आली. समृद्धी महामार्गावरील लूटप्रकरणी आरोपीला आमिष दाखवून वेशांतर केलेल्या पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईत गुटखामाफीयासह चार फरार आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्याय. याआधी याप्रकरणी पोलिसांनी 7 आरोपींना अटक केली होती. आता 4 आरोपींना अटक केल्याने या प्रकरणातील आरोपींची संख्या 11 वर पोहचली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील पोलिसांना गुंगारा देत असलेला आरोपी ओमकार फसले म्हाळस जवळा गावात लपल्याची माहिती पोलिसांना भेटली. पोलिसांनी गुत्तेदाराचे वेशांतर करत वाळूच्या वाहतुकीसाठी ड्रायव्हर पाहिजे, असे सांगितले. यासाठी एका टिप्परला 10 हजार रुपये देतो, अशी ऑफर देण्यात आली. पान टपरी चालकाने ही माहिती आरोपीच्या मित्राला दिली. त्यानंतर आरोपी जाळ्यात अडकला.
Chhatrapati Sambhajinagar Crime News: आरोपींना फिल्मी स्टाईलमध्ये केलं जेरबंद
याप्रकरणी ओमकार रामचंद्र फसले, भीमराव उर्फ शहादेव भगवान तांदळे, सुनील गणपत चव्हाण आणि सुनील कल्याण शेंडगे असे चार आरोपींची नाव असून सर्वजण एकाच ठिकाणी लपले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या दुसऱ्या पथकाने कायगाव टोका परिसरात सापळा रचून भीमराव उर्फ शहादेव तांदळे आणि सुनील चव्हाण यांना ताब्यात घेतले, त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली. दरोड्यासाठी टोळीला स्वतःचे वाहन पुरवणाऱ्या सुनील शेंडगे यालाही तिसगाव परिसरातून पकडण्यात आले.
Crime News : आरोपींच्या शोधांसाठी पोलिसांनी दिल्ली, नाशिक, पुणेसह विविध जिल्ह्यात पोलीस पथकांची कारवाई
पोलिसांनी या प्रकरणी आधीच परशुराम मोहन गायकवाड,किरण अजिनाथ गायकवाड,करण भरत जाधव,अनिल जयराम जाधव,पंडित उर्फ चन्नाअप्पा सखाराम लष्करे,ज्ञानेश्वर शहादेव जाधव, उमेश गायकवाड या सात आरोपींना विविध ठिकाणावरून कारवाई करत 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपींच्या शोधांसाठी पोलिसांनी दिल्ली, नाशिक, पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, बीड तसेच छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्ह्यातील विविध भागात पथकांनी ही कारवाई केली.
इतर महत्वाच्या बातम्या





















