Rajasthan : राजस्थानच्या जोधपूरमध्ये भरधाव गाडीने एका पोलीसाला धडक दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. एका कार चालक वकिलाने भरधाव वेगात निष्काळजीपणे गाडी चालवत नाकाबंदी दरम्यान ड्युटीवर उभ्या असलेल्या पोलीसाला जोरदार धडक दिली. या घटनेत ऑन ड्युटी जवानाचा मृत्यू झाला आहे. कार चालक वकीलाचा सलमान खानशी देखील खास संबंध आहे. सलमान खानविरोधातील (Salman Khan) कळवीट शिकार प्रकरणात वकील महिपाल बिष्णोई (Mahipal Bishnoi) यांनी बिष्णोई समाजाच्या वतीने केस लढवली होती.
जोधपूरहून पालीकडे जाणाऱ्या महामार्गावरील झालमंड स्त्यावर रात्री उशिरा नाकाबंदी करत असलेल्या रमेश सरन (Ramesh Saran ) या पोलीस कर्मचाऱ्याला एका कार चालकाने एवढी जोराची धडक दिली की, रमेश डिव्हायडरच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पडले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या रमेश यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, उपचारादरम्यान रमेश यांचा मृत्यू झाला.
भरधाव कारच्या वेगावर नियत्रंण मिळवणे होते कठीण!
27 वर्षीय कॉन्स्टेबल रमेश सरन केतू, शेरगढ येथील रहिवासी असून ते पोलिस दलात हवालदार पदावर कार्यरत होते. राजस्थानच्या कुडी पोलीस ठाण्यात ते तैनात होते. शुक्रवारी रात्री 12.45च्या सुमारास ते झालमंड महामार्गावर कर्तव्य बजावत होते. यादरम्यान भरधाव वेगात येणाऱ्या कारने प्रथम डिव्हायडरला धडक दिली आणि नंतर हवालदार रमेश सरन यांनाही जोरदार धडक दिली.
कारचा वेग एवढा होता की, अपघातानंतर कार देखील दुसऱ्या डिव्हायडरवर आदळली. या दरम्यान रमेश जबर जखमी झाले. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्ताडीने त्यांना एम्समध्ये आणले. सदर घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारीही रुग्णालयात पोहोचले. मात्र, उपचारादरम्यान रमेश यांचे निधन झाले.
आरोपी पोलिसांच्या ताब्यात
कार चालक वकील महिपाल बिष्णोई यांना पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी केली. आरोपी दारूच्या नशेत असल्याचे पोलिसांनी नाकारले आहे. या घटनेची तपास होणार असून, आरोपीला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरा घडलेल्या या घटनेनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून घटनेची माहिती घेतली.
पोस्टमॉर्टम केल्यानंतर डॉक्टरांनी कॉन्स्टेबल रमेश सरन यांचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. पोलिसांनी या अपघातात प्राण गमवलेल्या हवालदार रमेश सरन यांना गार्ड ऑफ ऑनर दिला. पोलीस आयुक्त रविदत्त गौर डीसीपी पश्चिम गौरव यादव व सर्व अधिकारी आणि जवानांनी सहकारी रमेश सरन यांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
हेही वाचा :
Jignesh Mehta : मॉडेलवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, स्टॉक ब्रोकर जिग्नेश मेहताविरुद्ध एफआयआर दाखल!