Ashok Kharat and Rupali Chakankar: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात आज एक मोठी घडामोड घडत आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) आज नाशिकमध्ये विशेष तपास पथकासमोर (SIT) हजर राहणार आहेत. या चौकशीसाठी त्या पुण्याहून नाशिककडे रवाना झाल्या असून सकाळी 10:30 च्या सुमारास त्या एसआयटीच्या कार्यालयात दाखल होतील.

Continues below advertisement

शेकडो महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणात मुख्य आरोपी असलेला अशोक खरात याच्याशी रुपाली चाकणकर यांचे निकटचे संबंध असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात होता. खरातसोबतचे काही फोटो व्हायरल झाल्यानंतर चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठली होती. त्या खरातला आपला 'गुरू' मानत असल्याने, मागील काही प्रकरणांमध्ये त्यांनी राजकीय हस्तक्षेप केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाने त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. परिणामी, चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. 

Ashok Kharat and Rupali Chakankar: आज एसआयटीसमोर चौकशीचा फेरा

दरम्यान, आज सकाळी 10:30 च्या सुमारास रुपाली चाकणकर नाशिकमध्ये एसआयटीच्या चौकशीला सामोरे जाणार आहेत. चौकशीसाठी त्या पुण्याहून नाशिककडे रवाना झाल्या असून त्यांच्यासोबत त्यांचे वकीलही असल्याची माहिती समोर येत आहे. एसआयटीकडून आज रुपाली चाकणकर यांची चौकशी केली जाणार आहे. आजच्या चौकशीत एसआयटी चाकणकर यांच्याकडून नेमकी कोणती माहिती मिळवते आणि यातून काय निष्पन्न होते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Continues below advertisement

Pratibha Chakankar: प्रतिभा चाकणकरांचा ईडी चौकशीत खळबळजनक दावा

दरम्यान, आज सकाळी 10:30 च्या सुमारास रुपाली चाकणकर नाशिकमध्ये एसआयटीच्या चौकशीला सामोरे जाणार आहेत. चौकशीसाठी त्या पुण्याहून नाशिककडे रवाना झाल्या असून त्यांच्यासोबत त्यांचे वकीलही असल्याची माहिती समोर येत आहे. एसआयटीकडून आज रुपाली चाकणकर यांची चौकशी केली जाणार आहे. आजच्या चौकशीत एसआयटी चाकणकर यांच्याकडून नेमकी कोणती माहिती मिळवते आणि यातून काय निष्पन्न होते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. तसेच, प्रतिभा चाकणकर यांचा मुलगा तन्मय चाकणकर यालाही ईडीने समन्स बजावले आहे. प्रतिभा चाकणकर यांना ईडीकडून पुन्हा चौकशीला बोलावले जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Nashik TCS Case Nida Khan Arrested: निदा खानने लपण्यासाठी खास लोकेशन निवडलं; आजूबाजूला एकही घर नाही, लांबलांबपर्यंत सापडण्याची शक्यताच नव्हती, मात्र पोलिसांनी कसं हुडकून काढलं?

Ashok Kharat Crime News: गुलाबी टी-शर्ट, वाढलेली दाढी; अशोक खरात कोर्टात स्तब्ध उभा राहिला; न्यायाधीशांनी प्रश्न विचारताच भोंदूने मान हलवली अन्...