Rupali Chakankar Guwahati Tour With Ashok Kharat:नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणी (Ashok Kharat Case) काल राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांची ईडीकडून 8 तास चौकशी करण्यात आली. ईडीच्या या चौकशीत अशोक खरातसोबत माझे कोणतेही आर्थिक व्यवहार नाहीत. मी त्यांना गुरू मानत होते, तो फक्त श्रद्धेचा भाव होता, असं रुपाली चाकणकरांनी स्पष्टीकरण दिलं. 

Continues below advertisement

रुपाली चाकणकरांनी अशोक खरातसोबत गुवाहाटी दौरा केला होता. अशोक खरात आणि रुपाली चाकणकरांनी 2021 मध्ये एकत्र गुवाहाटीचा दौरा केला होता. यावेळी रुपाली चाकणकरांसोबत त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर देखील अशोक खरातसोबत्या गुवाहाटी दौऱ्यावर होत्या. यादरम्यानचे काही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. काल जेव्हा ईडीच्या चौकशीनंतर रुपाली चाकणकर बाहेर आल्या, त्यावेळी माध्यमांशी त्यांना अशोक खरातसोबतच्या या गुवाहाटी दौऱ्याबाबत प्रश्न केला. (Rupali Chakankar Guwahati Tour With Ashok Kharat)

अशोक खरातसोबत गुवाहाटी दौरा, रुपाली चाकणकर काय म्हणाल्या? (Rupali Chakankar Guwahati Tour With Ashok Kharat)

अशोक खरातचं कुटुंब अगोदर गेलं होतं. त्यानंतर आम्ही कुटुंबासोबत गेलो होतो. आपल्या गुरुसोबत दर्शन घेण्यासाठी आम्ही गेलो होतो. अनेकांची श्रद्धा होती. आमचीही होती, असं रुपाली चाकणकरांनी प्रतिक्रिया दिली. तसेच गुवाहाटीचा जो फोटो समोर आला आहे त्या फोटोमध्ये खरात आणि माझे कुटुंबीय आहेत, असंही रुपाली चाकणकर म्हणाल्या. यापूर्वी गुवाहाटीला माझ्या कुटुंबाने देवीचे दर्शन घेतलेले नव्हते. त्यामुळे आपल्याला आपल्या गुरुसोबत देवीचं दर्शन करता आलं, तर छान होईल, असा अध्यात्मिक भाव ठेवून आम्ही स्वतंत्रपणे पुण्याहून प्रवास करून गेलो होतो. त्यानंतर गुवाहाटीत आम्ही अशोक खरातसोबत देवीचं दर्शन घेतलं होतं, अशी माहिती रुपाली चाकणकरांनी दिली. 

Continues below advertisement

खरातसोबत आमचा कोणताही आर्थिक व्यवहार नाही- रुपाली चाकणकर (Rupali Chakankar On Ashok Kharat Case)

मला जेव्हा जेव्हा चौकशीला बोलावलं, तेव्हा तेव्हा मी आले. शिर्डी पोलीस स्थानकामध्ये माझ्या बहीणीची देखील चौकशी झाली. खरात प्रकरणात आमचा कोणताही संबंध नाही. एसआयटीचे प्रश्न वेगळे होते. पोलिसांचे प्रश्न वेगळे होते. समता पथ संस्थेत मी कधीही गेले नव्हते. समता पतसंस्थेत बोगस खाती आहेत. समता पतसंस्थेसोबत माझ्या बहिणीचा कोणताही संबध नाही. खरातसोबत आमचा कोणताही आर्थिक व्यवहार नाही, असं रुपाली चाकणकरांनी सांगितले.

सलग 49 दिवस एसआयटीने अशोक खरातची चौकशी, 105 साक्षीदारांचे जाबजबाब- (Ashok Kharat Case)

सलग 49 दिवस एसआयटीने अशोक खरातची चौकशी केली असून 105 साक्षीदारांचे जाबजबाब नोंदनविण्यात आले आहे, अशोक खरातच्या घरी, कार्यलयात, फार्म हाऊसवर छापा मारून अनेक पुरावे जप्त करण्यात आले आहे, इलेक्ट्रॉनिक, पुरावे,कागदपत्रे यासह इतर पुराव्याचा यात सहभाग आहे. साक्षीदारांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. खरात हा ईशानेश्वर मंदिर परिसरात हातचलाखीने स्वतःकडे दैवीशक्ती असल्याचे भासवून भाविकांच्या कुटुंबावर मृत्यूचे सावट असल्याचे सांगून, भीती दाखवून तो खडे, चिंचुके आणि रुद्राक्ष देऊन पुजेच्या नावाखाली लाखो रुपये उकळले आहेत. तर, पीडित महिलांना बदनामीची धमकी देत त्याने त्यांचे लैंगिक शोषण केल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे. सराफा व्यावसायिक, डॉक्टरसह अनेकांची या प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे.

संबंधित बातमी:

Ashok Kharat Case: अशोक खरातची SIT कडून सलग 49 दिवस चौकशी; 105 साक्षीदारांचे जबाब आणि 1200 पानांचे दोषरोपपत्र दाखल