Mumbai Protest Girl Riya Ahir: नीट पेपर फुटी विरोधातील मुंबईतील आंदोलनाचा एक चेहरा झालेल्या रिया यादव अहिरला (Riya Yadav Ahir) आत्ता ऑनलाईन छळाचा सामना करावा लागतोय. दादर येथील आंदोलनादरम्यान ताब्यात घेतलेल्या मुलांना घेऊन जाणाऱ्या पोलीस व्हॅनना रियाने एकटीने थांबवलं होतं. पोलिसांच्या व्हॅनसमोर नेटाने उभ्या राहणाऱ्या रियाचा फोटो सोशल मिडियाने अक्षरश: उचलून धरला होता आणितिच्यायाधाडसाचंसर्वस्थरातूनकौतुककेल्याजातहोते. मात्र, विद्यार्थ्यांसाठी यंत्रणेसमोर उभ्या राहणाऱ्या रियाला आता ऑनलाईन धमकावण्यासह बदनामीचा (Bullying and defamation) सामना करावा लागतोय. तरयाविषयी तक्रार देण्यासाठी रिया सध्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झालीअसूनपोलीसयाप्रकरणीआतानेमकीकायकारवाईकरतातहेपाहणंमहत्वाचंठरणारआहे.
यासंदर्भातबोलतानारिया म्हणालीकी, माझा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर मला ट्रोल देखील खूप करत आहेत. माझ सोशल मीडिया अकाउंट बाबत देखील प्रश्न उपस्थित करत आहेत की हे सगळं फेक आहे. मुळात माझ अकाउंट फेक नाही. मला कुठल्याही त्यामुळे जाहिराती मिळत नाही. एका यूट्यूबरने काही चुकीचे व्हिडिओ देखील माझ्या बाबत तयार केले आहेत. जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. मी या सर्व प्रकरणी पोलिसांत तक्रार करणार आहे. अशीमाहितीतिनेएबीपीमाझाशी बोलताना दिलीय.
पोलिसांच्या गाडीला हाताने अडवत तब्बल 40 मिनिटे रोखून धरणारी रिया यादव अहिर कोण? (Who Is Riya Ahir)
नीट पेपरफुटीवरून जंतर मंतरवर सुरु असलेल्या आंदोलनानंतर देशभरात या आंदोलनाला बळ मिळालं. अनेक प्रमुख शहरांमध्ये केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी एकत्र आले. दरम्यान, मुंबईत ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या गाडीला हाताने अडवत तब्बल 40 मिनिटे ठामपणे उभी राहिलेल्या रिया यादव अहिर सध्या एकच चर्चा आहे. दरम्यान 27 वर्षीय रिया अहिर मुंबईतील आंदोलकांना घेऊन जाणाऱ्या पोलीस व्हॅनसमोर उभे राहून सगळ्यांना तात्काळ सोडण्याची मागणी करताना ती दिसली होती. शिवाजी पार्कजवळ रियाने भर पावसात पोलिसांचं वाहन अडवलं. तिचे अनेक फोटोज व्हिडिओज व सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रिया अहिर अभिनेत्री असून मॉडेल आणि सूत्रसंचालिकाही आहे. मात्रयासगळ्याप्रकरणानंतरतिलाआतावेगळ्यात्रासालासमोरजावंलागतअसूनयासंदर्भाततिनेपोलिसांकडेतक्रारदाखलकरण्याचापवित्राघेतलाआहे.
इतरमहत्वाच्याबातम्या
