नाशिक : नाशिक पोलिसांनी रेमेडिसीवहीरचा काळाबाजार करणारे मोठ रॅकेट उद्ध्वस्त केलं आहे. नाशिक पासून ठाणे पालघरमधून रॅकेटची पाळमुळ शोधून काढण्यात पोलिसाना यश आलंय. 3 नर्ससह 9 जणांना अटक करण्यात आलीय.आतपर्यंत काळाबाजारात विक्रीसाठी आणलेले 85 इंजेक्शन या अंतराज्यीय टोळीकडून जप्त करण्यात आली आहे.


 एप्रिल महिन्यापासून नाशिक शहरात रुग्ण संख्या झपाट्यान वाढू लागली. रेमडिसिव्हिरचा तुटवडा जाणवू लागला. रुग्ण वाचवयाचा असले तर रेमडिसिव्हिर घेऊन या असे फर्मान खाजगी रुग्णालयकडून सोडले जाऊ लागले. आधुनिक जगातील हीच संजीवनी वाटू लागल्यान रुग्णाचे नातेवाईक रेमडिसिव्हिरच्या शोधात केवळ शहर जिल्हा नाही तर मुंबई, ठाणे, पुणे ही गाठू लागले. यातूनच टाळूवरच लोणी खणाऱ्यांचे बुरखे फाटू लागले अन रेमडिसिव्हिरचा सर्रास काळाबाजार सुरू झाला. 


नाशिक जिल्ह्यात 6 ते 7 गुन्हे दाखल झालेत यात डॉक्टर, वॉर्डबॉयसह काही दलालांना अटक करण्यात आली होती. मात्र आठ दिवसपूर्वी अडगाव पोलिसांनी सापळा रचून दोन नर्सला रंगेहात अटक केली. त्यांच्याकडून 3 हजार किमतीचे 2 इंजेक्शन जप्त करण्यात आले. 54 हजार रुपयात त्यांची विक्री केली जात होती. यातूनच आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश झालाय. 


नाशिकच्या मुंबईनाका परिसरातील रुग्णालयाच्या 3 नर्स आणि गोविंदनगर परिसरातील रुग्णालयातिल एका फार्मसिस्टला अटक केल्यानंतर वेगवान तपासची चक्र पोलिसानी फिरवत विरार आणि पालघर मधून आणखी चार जणांना 20 इंजेक्शनसह ताब्यात घेतले. मुंबई ठाणे पालघरला तोक्ते चक्रीवादळचा इशारा दिलेला असताना या वादळतच नाशिक पोलिसांनी पालघरमध्ये जाऊन काळाबाजार करणारे रॅकेट उद्धवस्थ केले. यात आणखी खोलवर जात पालघर मधील एक कंपनीत काम करणरया सिद्धेश पाटील या मुख्य सूत्रधारला पोलिसानी अटक केली आहे.


  अडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक इरफान शेख यांच्या माहितीनुसार सिद्धेश कंपनीतून रेमडिसिव्हिर चोरून आणायचा आणि आपल्या साथीदारांच्या ताब्यात द्यायचा. त्याच्याकडून पोलिसांनी लेबल लावलेले 1 आणि विनालेबलचे 62 असे एकूण 63 इंजेक्शन आज हस्तगत केले असून अटपऱ्यानर या गुन्ह्यात 9 संशयितांकडून 85 रेमडिसिव्हिर इंजेक्शन जप्त करण्यात आले आहे. काळ्या बाजारात विक्री करून प्रत्येकजण आपला  3 ते 5 हजार रुपयांचा वाटा काढून घेत होता. 40 ते 45 हजार रुपयांची किमत सांगून बारगेनिंग करत 27 ते 30 हजार पर्यंत करून विक्री केली जात होती. 


नाशिक पोलिसांनी आतपर्यंत केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे या नंतर राज्यीय टोळीत आणखी काही जण गुंतले असण्याची शक्यता असून त्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे. या सर्व संशयितांना आज न्यायलयात हजर केल असता 8 जणांची न्यायालयीन तर एकाची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.