Rajasthan Salasar Road Acciddent : राजस्थानातील सालासर रोडवर एक भीषण अपघाताची (Acciddent News) घटनाघडलीआहे. याअपघातातनागपूरच्या (Nagpur) कामठी येथेराहतअसलेल्या पारसे कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याचीदुर्दैवीघटनाघडलीआहे. यात आई, वडील आणि मुलगा जागीच ठार झालाआहे. तरइतर सहा जण गंभीर जखमी असूनत्यांच्यावरसध्यारुग्णालयातउपचारसुरुआहे. राजस्थानातील खाटू श्याम बाबांच्या दर्शनासाठी जातअसतानाहाअपघातझालाअसूनभाविकांवर काळानंघालाघातलाआहे. याघटनेनंनागपूरच्या कामठीमध्येखळबळउडालीअसूनपरिसरात हळहळ व्यक्तकेलीजातआहे.
Accident News : टवेरा गाडीला पिकअपची जोरदार धडक, एकाचकुटुंबातीलतिघांचाजागीचअंत
मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये महादेव पारसे, त्यांची पत्नी कांता पारसेआणि मुलगा घनश्याम यांचा समावेश आहे. खाटू श्याम बाबांच्या दर्शनासाठी जात असताना टवेरा गाडीला पिकअपने जोरदार धडक दिली. हिधडकइतकीजोरदारहोतीकियातदोन्हीवाहनांचमोठंनुकसानझालंआहे. तर पारसे कुटुंबातील तिघांचादुर्दैवीमृत्यूझालाअसूनइतर सहा जण गंभीर जखमी झालेआहेत. जखमींमध्ये चालक मनोज चिंदमवारसह आराधना पारसे, पायल पारसे , पल्लवी पारसे, पुनम पारसे, तुषार पारसे आणि पवन बागडे यांचासमावेशआहे. सर्व जखमींवर सालासर येथील रुग्णालयात सध्याउपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच कामठीतील कचरीपुरा परिसरात शोककळा पसरलीआहे. तर मृतदेह शवविच्छेदनानंतर कामठी येथे आणण्यात येणार असल्याचीमाहितीआहे.
Bhandara Accident News : संतप्त नातेवाईकांनी ठेवला सनफ्लॅग कंपनीच्या प्रवेशद्वारावर मृतदेह
स्टील उत्पादक सनफ्लॅग कंपनीत प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक असलेल्या तरुणाचा रॅश ड्रायव्हिंगनं बळी घेतला. ही घटना भंडाऱ्याच्या वरठी येथील सनफ्लॅग कंपनीच्या प्रवेशद्वारावर दोन दिवसांपूर्वी घडली होती. कर्तव्यावर असलेला हा सुरक्षारक्षक प्रवेशद्वार बंद करीत असताना त्याचवेळी भरधाव आणि रॅश ड्रायव्हिंग करून कंपनीत प्रवेश करणाऱ्या एका कार चालकानं त्याला जबर धडक दिली, यात तो गंभीर जखमी झाला. प्रथम भंडाऱ्यात आणि नंतर त्याच्यावर नागपूर इथं उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. सितीन रहांगडाले (२५) असं मृतकाचं नावं असून तो मुळचा गोंदिया जिल्ह्याच्या तिरोड्यातील डव्वेटोला येथील रहिवासी आहे. कुटुंबीयांनी आज त्याचा मृतदेह थेट सनफ्लॅग कंपनीच्या प्रवेशद्वारावर ठेवला. सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या एजन्सीनं मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मोबदला आणि मृत्युनंतरचे सर्व आर्थिक लाभ द्यावे, अशी मागणी करण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत हा मृतदेह कंपनीच्या प्रवेशद्वारावर ठेवण्यात आला होता. यानंतर सनफ्लॅग कंपनी प्रशासनं आणि सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या एजन्सीनं मृतकाच्या कुटुंबीयाला आर्थिक मोबदला आणि लेखी आश्वासन दिल्यानंतर प्रकरण निवळलं. दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता वरठी आणि भंडारा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
इतर महत्वाच्या बातम्या
