Raigad Crime Khalapur Murder case:रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुका (Khalapur Taluka) दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने हादरला आहे. खालापूर तालुक्यातील निगडोली गावात मंगळवारी ही घटना उघड झाली. या गावातील वृद्ध जोडप्याचा गळा चिरुन निर्घृणपणे खून (Murder news) करण्यात आला आहे. या दोघांचे मृतदेह सापडल्यानंतर निगडोली गावात आणि खालापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. या वृद्ध जोडप्याची हत्या कोणी केली आणि त्यामागील कारण काय, हे अद्याप समोर आलेले नाही. (Raigad Crime news)

Continues below advertisement

प्राथमिक माहितीनुसार, 75 वर्षीय रघुनाथ फराट आणि त्यांच्या 72 वर्षीय पत्नी सुरेखा फराट यांचे मृतदेह घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले. या दोघांच्याही मृतदेहांवर राख आणि पालापाचोळा टाकण्यात आला होता. रघुनाथ फराट आणि सुरेखा फराट हे दोघेही फोन उचलत नसल्याने त्यांचा नातू निगडोली येतील त्यांच्या घरी पोहोचला. तेव्हा घरात त्याला आपले आजी-आजोबा मृतावस्थेत आढळून आले. या घटनेची वर्दी मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.  खालापूर पोलिस आणि फॉरेन्सिक पथक यांच्याकडून हत्येमागचा तपास सुरु आहे. अज्ञात आरोपींविरोधात खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून सध्या पुढील तपास सुरु आहे. 

Beed Crime: बीडमध्ये शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

Continues below advertisement

बीडच्या परळी शहरात एका हॉटेलमध्ये थरारक प्रसंग घडला. परळीतील शिवसेना शिंदे गटाचे (Shivsena Shinde Camp) नेते शिवाजी शिंदे हे आपल्या हॉटेलमध्ये थांबलेले असताना त्या ठिकाणी आलेल्या एका युवकाने हात हातात कोयता घेत त्यांच्यावर हल्ला चढवला. याच घटनेत शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत. हॉटेलमधील इतर लोकांनी या युवकाला पकडून ठेवल्याने शिंदे यांचा जीव वाचवला.  दरम्यान हा सर्व थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला. त्यांच्यावर अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या हल्ल्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. (Beed Crime news)

आणखी वाचा

Kalyan Crime News: माहेरी आलेल्या 25 वर्षीय मुलीला बापाने संपवलं; किरकोळ कारणावरुन बाप-लेकीचा वाद, कल्याणमधील घटनेनं खळबळ

Nagpur Crime News: 'क्या रे जॉनी' म्हणत डोक्यावर टपली मारताच संतापला, नागपूरमध्ये क्षुल्लक वादातून तरुणाला संपवलं; दुचाकीवरून आला अन्...