Raigad Crime News: 'मी जीवन संपवतोय', पत्नीला शेवटचा मेसेज पाठवला, मोबाईल बंद केला अन्...; विठूरायाच्या भक्ताने टकमक टोकावरून उडी मारून जीवन संपवलं
Raigad Crime News: किल्ले रायगडावरील टकमक टोकावरून उडी मारून जीवन संपवत असल्याचा व्हॉट्सॲप मेसेज पत्नीला पाठवून बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह दरीत आढळून आला आहे.

Raigad Crime News: ऐतिहासिक किल्ले रायगडावरून (Raigad Fort) एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. "मी टकमक टोकावरून उडी मारून जीवन संपवत आहे," असा मेसेज पत्नीला व्हॉट्सॲपवर पाठवून बेपत्ता झालेल्या 37 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. सुयोग सुरेश पांचाळ (वय 37, मूळ रा. बीजघर, खेड, जि. रत्नागिरी; सध्या रा. रामनगर, वागळे इस्टेट, ठाणे) असे मृत तरुणाचे नाव आहे.
Raigad Crime News: पायथ्याशी गाडी लावली अन् पायऱ्यांनी गाठले टकमक टोक
मिळालेल्या माहितीनुसार, सुयोग पांचाळ हा शनिवारी पहाटेच्या सुमारास किल्ले रायगडावर आला होता. त्याने आपली अर्टिगा कार गडाच्या पायथ्याशी पार्क केली आणि पायरी मार्गाने गडावर गेला. सकाळी साडेसातच्या सुमारास तो टकमक टोकावर पोहोचला. तेथे पोहोचल्यानंतर त्याने टकमक टोकाचे फोटो काढून पत्नीला व्हॉट्सॲपवर पाठवले आणि "मी इथून उडी मारून जीवन संपवत आहे," असा मेसेज केला. या मेसेजपाठोपाठ त्याचा मोबाईल फोन बंद झाला.
Raigad Crime News: भावाची धावपळ अन् पोलिसांची शोधमोहीम
या मेसेजची माहिती मिळताच सुयोगचा भाऊ सुवेल पांचाळ याने तातडीने रायगड गाठले. त्याने टकमक टोकासह गड परिसरात सुयोगचा शोध घेतला, मात्र तो कुठेही आढळला नाही. अखेर शनिवारी सायंकाळी महाड तालुका पोलिसांना (Mahad Taluka Police) या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी गड परिसरात शोध सुरू केला असता गडाच्या पायथ्याशी सुयोगची कार उभी असलेली आढळली. मात्र, रात्र झाल्याने शनिवारी रात्री शोधमोहीम थांबवावी लागली.
Raigad Crime News: ड्रोनच्या मदतीने दरीत आढळला मृतदेह
रविवार सकाळपासून पोलीस पथक, स्थानिक रेस्क्यू टीम आणि ग्रामस्थांच्या मदतीने पुन्हा मोहीम सुरू करण्यात आली. दरी अत्यंत खोल असल्याने शोध घेण्यास अडचणी येत होत्या. अखेर ड्रोनच्या साहाय्याने दरीत पाहणी केली असता एका ठिकाणी सुयोगचा मृतदेह दिसून आला.
Raigad Crime News: विठूरायाचा भक्त अन् कपाळाला बुक्का...
दरम्यान, मृत सुयोग हा विठूरायाचा भक्त असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेच्या वेळी त्याच्या कपाळाला काळा बुक्का लावलेला होता. एका हसतमुख आणि वारकरी निष्ठा असलेल्या तरुणाने असे टोकाचे पाऊल का उचलले? याबाबत गूढ निर्माण झाले असून, महाड तालुका पोलीस याप्रकरणी पुढील सखोल तपास करत आहेत.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा





















