Pune SSC Exam 10th Exam : राज्यात दहावी-बारावीची परीक्षा कॉपीमुक्त आणि तणावमुक्त वातावरणात पार पडावी म्हणून राज्य मंडळाने शर्थीचे प्रयत्न केलेत. मात्र त्यानंतरही अनेक प्रकार समोर येत आहेत. एकीकडेनागपुरातीलपेपरफुटीचंप्रकरणराज्यातगाजतअसताना पुणे जिल्ह्यातहीअसाचकाहीसाप्रकारघडल्याचेसमोरआलंआहे. पुण्यात (Pune) दहावीचा गणिताचा पेपर (Math Question Papers Leak)  टेलिग्रामवर लीक झाल्यानेएकचखळबळउडालीआहे. याप्रकरणी पुणे बोर्डाने पोलिसांत तक्रार दाखलकेलीअसूनपोलीसयाप्रकरणाचाअधिकतपासकरतआहे. (Pune 10th Exam)

Continues below advertisement

Pune SSC Paper Leak : गणित भाग-2 चा पेपर तीन दिवस आधीच ग्रुपवर

मिळलेल्यामाहितीनुसार, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत गंभीर प्रकार उघड झाला आहे. गणित भाग-1 आणि भाग-2 चे पेपर परीक्षा होण्यापूर्वीच एका टेलिग्राम ग्रुपवर प्रसारित झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे गणित भाग-2 चा पेपर तीन दिवस आधीच ग्रुपवर टाकण्यात आल्याचे यात आढळले आहे. परिणामी, बोर्डाने अधिकृत प्रश्नपत्रिकेशी पडताळणी केली असता दोन्ही पेपर तंतोतंत जुळल्याचे स्पष्ट झाले आहे.

Continues below advertisement

Pune SSC Exam : परीक्षेपूर्वीचबोर्डाचापेपर लीक, अ‍ॅडमिनसह ग्रुप सदस्यांवर गुन्हा दाखल

या प्रकरणी पुणे विभागीय मंडळाने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून टेलिग्राम ग्रुप अॅडमिन व सदस्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मात्र, विद्येचेमहेरघरअसलेल्यापुण्यातहासर्वप्रकारघडल्यानेशिक्षणक्षेत्रातमोठीखळबळउडालीआहे. दरम्यान पोलिसांकडून तांत्रिक तपास सुरू आहे. मात्रबोर्डाचापेपरपरीक्षेपूर्वीचलीककसाकायझाला? यातनेमकंकुणाचाहातआहे? असेअनेकप्रश्नयानिमित्यानेआताउपस्थितकेलेजातआहे. त्यामुळेयाप्रकरणीमुख्यसूत्रधारशोधूनकाढणंहे पोलिसांपुढेआव्हानअसणारआहे.

Beed News: पेपरचे चिट दगडात गुंडाळून विद्यार्थ्यांना कॉपीचा पुरवठा; गेवराईतील पाडळशिंगी परीक्षा केंद्रावरील प्रकार समोर

बीडच्या गेवराईतील पाडळसिंगी परीक्षा केंद्रावर सुरू असलेल्या कॉपी पुरवठ्याचा एक व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होतोय. यंदाच्या बारावी परीक्षा कॉपी मुक्त व्हाव्या याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष पावलं उचलली. परंतु पहिल्याच दिवशी कॉपीमुक्त अभियानाला हरताळ फासण्यात आले. गेवराई तालुक्यातील पाडळशिंगी येथे एका परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना नातेवाईकांकडून कॉपी पुरवण्याचा व्हिडिओ समोर आला. पेपरचे चीट एका दगडात गुंडाळून खिडकीद्वारे फेकण्याचा प्रकार यातून दिसत आहे. दोन दिवसांपूर्वीच कॉपी पुरवठा प्रकरणात 17 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र तरी देखील बीडच्या ग्रामीण भागात हे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाही.

इतर महत्वाच्या बातम्या