पुणे :महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि शैक्षणिक पंढरी म्हणून ओळख असलेल्या पुणे (Pune) शहरात गेल्या काही वर्षात गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून येत आहे. मारहाण, हत्या आणि लैंगिक अत्याचाराच्या घटनांनी पुणे शहर हादरलं असतानाच, आता बाप-लेकाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आलीय. पैशाच्या वादातून वडिलांनीच चक्क मुलाच्या अंगावर घरातील स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारे ॲसिड फेकल्याची घटना कोथरूडमधील केळेवाडी येथे घडली आहे. या घटनेत मुलाला डोळा आणि चेहऱ्याला दुखापत झाली असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणात, पोलिसांनी (Crime news) वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

Continues below advertisement

पैशाच्या वादातून वडिलांनीच मुलावर ॲसिड हल्ला केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे, याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर वडील पसार झाले आहेत, या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत. तुषार शाम कदम (वय 30) असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. तुषारने कोथरूड पोलिसांत वडिलांविरुद्ध तक्रार दिल्यानंतर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तुषार 14 मे रोजी घरात झोपला असताना, त्याचा पैशावरुन वडिलांसोबत वाद झाला होता. दोघांमधील वाद टोकाला गेल्याने वडिलांनी स्वच्छतागृहात स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या ॲसिडची बाटलीच मुलाच्या अंगावर फेकली, त्यात मुलगा तुषारच्या चेहऱ्यावर बाटलीतील द्रव्य पडल्याने मुलगा जखमी झाला आहे. त्यानंतर, त्याला खासगी रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले असून पोलिसातही तक्रार देण्यात आली. याप्रकरणी, अधिक तपास कोथरूड पोलीस करत आहेत. 

Continues below advertisement

हेही वाचा

दादा कोंडकेंसोबत काळ गाजवला, अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या; व्ही. शांताराम पुरस्कार शासनाला परत, आनंदाश्रमात ठेवला