Pune Shivajinagar Court Mandhar Kiwale Case: पुण्याच्या शिवाजीनगर भागातील सत्र न्यायालयाच्या (Pune Shivajinagar Court) जवळ काल (25 नोव्हेंबर) 6 जणांच्या टोळक्याने मंदार किवळे (Pune Mandhar Kiwale Case) याच्यावर आधी गोळीबार केला. गोळीचा नेम चुकल्यानंतर त्यांनी मंदार किवळेचा पाठलाग केला आणि त्यानंतर त्यांच्यावर कोयत्यानं वार केले. यात त्याचे दोन्ही हात तुटले होते. गंभीर जखमी झालेल्या किवळेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.दरम्यान आरोपींनी हल्ला केल्यानंतर हम बाप है अशा घोषणा देत दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. 2025 मध्ये पुण्याच्या कात्रज भागात जमिनीच्या वादातून शुभम चव्हाण (Shubham Chavan) या तरुणाची हत्या करण्यात आली होती. त्या आरोपींमध्ये किवळेही होता. अटकेतील किवळेला 2 दिवसांपूर्वीच जामीन मिळाला होता. त्यानंतर आरोपींनी हीच संधी साधत किवळेला लक्ष्य केलं. दरम्यान याप्रकरणी आत्तापर्यंत 6 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. (Pune Firing News)
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, शुभमचा सख्खा भाऊ अक्षय चव्हाण यानेच संपूर्ण कट रचला. तसेच, या कटाची अंमलबजावणी करण्यासाठी त्याने इतर आरोपींना सुपारी दिल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील शिवाजीनगर सत्र न्यायालयाबाहेर मंदार किवळेवर झालेला जीवघेणा हल्ला बदल्याच्या भावनेनं केल्याची माहिती समोर आली. 2025 मध्ये झालेल्या शुभम चव्हाण हत्या प्रकरणाचा बदला घेण्यासाठी हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. शुभमचा भाऊ अक्षय चव्हाणने 12 ते 15 तरुणांना एकत्र करून कट रचल्याची माहिती समोर आलीय. जामिनावर बाहेर आलेल्या मंदार किवळेवर पाळत ठेवून हल्ला केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. जखमी किवळेवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहे. (Pune Crime News)
अखेर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना आली जाग- (Pune Shivajinagar Court Mandhar Kiwale Case)
शिवाजीनगर कोर्टबाहेर गोळीबार आणि कोयता हल्ल्यानंतर पोलीस आयुक्त अमिते शकुमार दिवसभर फिरकले नाहीत. ते कोर्टपासून जवळचं असलेल्या शिवाजीनगर मुख्यालयातच हजर होते. पोलिसांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत ते व्यस्त होते. पण पुण्याला हादरून सोडणाऱ्या आणि न्यायालयाच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करणाऱ्या धक्कादायक घटनेनंतर, ते घटनास्थळी दिवसभरात फिरकले नाहीत. आता मात्र पोलीस आयुक्तांना जाग आलीये. ते उद्या सुरक्षेच्या दृष्टीने न्यायालय आवाराची पाहणी करणार आहेत. त्यानंतर बैठक घेऊन पुढची पावलं उचलली जातील. पण घडलेल्या घटनेचं काय? असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे.
न्यायालय परिसरातील हल्ल्यात जखमी मंदार किवळेला राजेश काची यांची मदत- (Pune Shivajinagar Court Mandhar Kiwale Case)
मंदार किवळे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर घटनास्थळी कोणीही त्यांच्या मदतीसाठी पुढे येत नव्हते. अशा परिस्थितीत राजेश दामोदर काची यांनी धाडस दाखवत जखमी किवळे यांना रिक्षातून ससून रुग्णालयात नेलं आणि उपचारासाठी दाखल केलं.हल्ल्याच्या घटनेनंतर जखमीला तातडीने रुग्णालयात पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम राजेश काची यांनी केलं. यासोबतच त्यांनी पोलिसांनाही घटनेची माहिती देत मदत केली. राजेश काची हे यापूर्वीही विविध घटनांमध्ये पोलिसांना मदत करत असल्याचं सांगितलं जात आहे. एखाद्या व्यक्तीचा मृतदेह घटनास्थळी पडलेला असला, तरी तो हलवण्यापासून ते पोलिसांना मदत करण्यापर्यंत ते पुढाकार घेतात.न्यायालय परिसरातील हल्ल्याच्या घटनेतही त्यांनी दाखवलेलं धाडस आणि माणुसकी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
