एक्स्प्लोर

Vaishnavi Hagawane Pune Crime: वैष्णवीला छळणाऱ्या हगवणे कुटुंबाला वाचवण्याचा पुणे पोलिसांचा प्रयत्न? सौम्य कलमं लावली, निलेश चव्हाणच्या केसमध्येही लूप होल ठेवला

Pune Crime: सुनेचा हुंडाबळी घेणाऱ्या हगवणेची फरार असताना अक्षरशः बडदास्त ठेवली गेल्याचे पुरावे 'एबीपी माझा'च्या हाती लागलेत. सात दिवस तो पुण्यापासून सातारा, बेळगावपर्यंत मोकाट फिरत होता

Pune Crime news: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पुणे पोलिसांची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. हगवणे कुटुंबाच्या विरोधात त्यांच्या सुनांकडून वेळोवेळी आलेल्या तक्रारींची दखल पोलिसांनी घेतली नाही. वैष्णवीच्या (Vaishnavi Hagawane) बाळाचं अपहरण झाल्यानंतरही पोलिसांनी अक्षम्य हलगर्जीपणा दाखवला. त्यामुळे पोलिसांनी (Pune Police) एकप्रकारे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या हगवणे कुटुंबीयांनीच पाठीशी घातल्याचा आरोप होतोय. आता कामात हयगय करणाऱ्या पोलिसांवर सरकार कारवाई करणार का, असा प्रश्न विचारला जातोय.

वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणेला अटक झाली. यानंतर पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली. पण ती केवळ १ मिनिटं १० सेकंदात आटोपली. एवढ्या संवेदनशील विषयावर बोलण्यासाठी सव्वा मिनिटही न देणारे पुणे पोलीस टीकेचे धनी बनलेत. मुळातच वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणात पुणे पोलिसांची भूमिका वादाच्या भोवऱ्यात सापडली. वैष्णवीचा जीव घेणाऱ्या हगवणे कुटुंबीयांनी मोठी सून मयुरीचाही अतोनात छळ केला होता. मयुरीनं नोव्हेंबर २०२४ मध्ये मारहाणीची पौड पोलीस ठाण्यात तक्रार केली.  गुन्हा दाखल होऊनही पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावींनी कारवाई केली नाही. मयुरीच्या मारहाणीपासून वैष्णवीच्या आत्महत्येपर्यंत पुणे पोलिसांनी पावलापावलाला हलगर्जीपणा केलाय. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे वैष्णवीचं नऊ महिन्यांचं बाळाची सहा दिवस आबाळ झाली.

Pune Police: पुणे पोलिसांनी हगवणे कुटुंबीयांना कुठे-कुठे फ्री हँड दिला?

फरार झाल्यानंतर राजेंद्र हगवणे औंध रुग्णालयात होता, पण त्याला अटक करण्यात आली नाही. 20 मे रोजी बाळाचा ताबा मिळवण्यासाठी कस्पटे कुटुंबीय वारजे पोलीस ठाण्यात गेले. आमची हद्द नाही, असं सांगत पीआय विश्वजीत कायंगडे यांनी तक्रार घेतली नाही. बावधन पोलीस स्टेशनचे पीआय विजय विभुते यांनीही कस्पटे कुटुंबीयांची तक्रार घेतली नाही. निलेश चव्हाणविरुद्ध बाळाच्या अपहरणाचा गुन्हा नोंदला नाही

निलेश चव्हाणच्या बायकोची तक्रार गांभीर्यानं घेतली असती तर तो आज मोकाट नसता. निलेशच्या लॅपटॉपवरील अश्लील चित्रफितीत असणाऱ्या महिलांशी जबरदस्ती झाली का, याची पोलिसांनी चौकशी केली नाही. पोलीस व सरकार हे हंगामी पद्धतीने ॲक्शन मोडमध्ये येत आहे का? वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. या प्रकरणातील पोलिसांचा तपास हलगर्जीपणाचा आहे. हलगर्जीपणा करणारे पोलीस आणि दुर्लक्ष करणारा महिला आयोग आहे, असे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटले.

वैष्णवीच्या अंगावर अनेक खुणा असूनही हगवणे कुटुंबीयांवर सौम्य कलमं लावल्याचाही आरोप केला जातोय. वैष्णवीच्या कसेमध्ये संशय येण्यासारखा प्रकार आहे. कलमं लावली आहेत ती सौम्य प्रकारची आहेत. 19 खुणा वैष्णवीच्या अंगावर आहेत. आमचं म्हणणं आहे ती हत्या आहे. त्याचे कलम लागणे गरजेचे आहे, 302 ब ची आम्ही मागणी करतोय. आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतोय, असे शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी म्हटले.

महाराष्ट्रातील पोलीस खाते प्रत्येक चौकी पोलीस स्टेशन हे राजकारण्यांच्या दबावाखाली काम करतात. हुंडाबळीच्या केसेस सुद्धा दबावाखाली चालवत असतील आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा राजकारणात अडकत असतील तर ही राजकारणाच्या बाबतीत खूप चिंताजनक परिस्थिती आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

Vaishnavi Hagawane suicide case: वैष्णवी हगवणे प्रकरणात कोणते पोलीस अधिकारी रडारवर?

1. पीआय विश्वजीत कायंगडे
2. पीआय विजय विभुते 
3. पीआय संतोष गिरी गोसावी 
4. पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड 
5. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे
6. IG जालिंदर सुपेकर

आणखी वाचा

दिल्ली दौऱ्यावर निघण्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांचा कस्पटेंना फोन; वैष्णवीच्या वडिलांच्या CM कडे 2 मागण्या

वैष्णवी हगवणेंची हत्या की आत्महत्या? राजेंद्र हगवणे अजितदादांचे जवळचे म्हणून अटक नाही का? पुणे पोलिसांनी स्पष्टच सांगितलं

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nilesh Rane: निवडणूक आयोगाला देखील कोर्टात खेचणार, अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर निलेश राणेंचा मोठा निर्णय; म्हणाले,  'ज्यांचा हातभार असेल त्यांच्यावर मी...'
निवडणूक आयोगाला देखील कोर्टात खेचणार, अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर निलेश राणेंचा मोठा निर्णय; म्हणाले, 'ज्यांचा हातभार असेल त्यांच्यावर मी...'
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, चांदी 2 लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता, सोन्याचे आजचे दर जाणून घ्या
2025 मध्ये सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, चांदी 2 लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता, सोन्याचे दर जाणून घ्या
Nagar Parishad and nagar panchayat Election: पुणे जिल्ह्यात दुपारी दिड वाजेपर्यंत 35.69 टक्के मतदान; जास्त टक्केवारी वडगावमध्ये तर सर्वांत कमी दौंडमध्ये
पुणे जिल्ह्यात दुपारी दिड वाजेपर्यंत 35.69 टक्के मतदान; जास्त टक्केवारी वडगावमध्ये तर सर्वांत कमी दौंडमध्ये
Hasan Mushrif: '...त्यावर बोलण्यात अर्थ नाही', उद्याची मतमोजणी रद्द, हायकोर्टाच्या निर्णयावर मंत्री हसन मुश्रीफांची मोजक्या शब्दात प्रतिक्रिया
'...त्यावर बोलण्यात अर्थ नाही', उद्याची मतमोजणी रद्द, हायकोर्टाच्या निर्णयावर मंत्री हसन मुश्रीफांची मोजक्या शब्दात प्रतिक्रिया
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Local Body Election Result : सर्व मतमोजणी 21 डिसेंबरला होणार,कोर्टाच्या निकालावर वकिलांचं विश्लेषण
Rohit Pawar On Voting : सर्वसामान्य जनता शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पाठिशी - रोहित पवार
Devendra Fadnavis PC आयोगाने प्रक्रियेत सुधारणा करावी, मतमोजणी पुढे ढकलल्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया
Sandeep Kshirsagar On Voting : निवडणूक हातातून गेल्यानं पैसे वाटपाचा प्रकार - संदीप क्षीरसागर
Vaibhav Naik On Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनीच मालवणात पैशांच्या बॅगा आणल्या, वैभव नाईकांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nilesh Rane: निवडणूक आयोगाला देखील कोर्टात खेचणार, अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर निलेश राणेंचा मोठा निर्णय; म्हणाले,  'ज्यांचा हातभार असेल त्यांच्यावर मी...'
निवडणूक आयोगाला देखील कोर्टात खेचणार, अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर निलेश राणेंचा मोठा निर्णय; म्हणाले, 'ज्यांचा हातभार असेल त्यांच्यावर मी...'
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, चांदी 2 लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता, सोन्याचे आजचे दर जाणून घ्या
2025 मध्ये सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, चांदी 2 लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता, सोन्याचे दर जाणून घ्या
Nagar Parishad and nagar panchayat Election: पुणे जिल्ह्यात दुपारी दिड वाजेपर्यंत 35.69 टक्के मतदान; जास्त टक्केवारी वडगावमध्ये तर सर्वांत कमी दौंडमध्ये
पुणे जिल्ह्यात दुपारी दिड वाजेपर्यंत 35.69 टक्के मतदान; जास्त टक्केवारी वडगावमध्ये तर सर्वांत कमी दौंडमध्ये
Hasan Mushrif: '...त्यावर बोलण्यात अर्थ नाही', उद्याची मतमोजणी रद्द, हायकोर्टाच्या निर्णयावर मंत्री हसन मुश्रीफांची मोजक्या शब्दात प्रतिक्रिया
'...त्यावर बोलण्यात अर्थ नाही', उद्याची मतमोजणी रद्द, हायकोर्टाच्या निर्णयावर मंत्री हसन मुश्रीफांची मोजक्या शब्दात प्रतिक्रिया
Girish Mahajan on Eknath Khadse: एकनाथ खडसे म्हणाले, गिरीश महाजनांसारखा मी वाया गेलो नाही, आता महाजनांकडून जशास तसं उत्तर; म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या रेसमधला माणूस असा...
एकनाथ खडसे म्हणाले, गिरीश महाजनांसारखा मी वाया गेलो नाही, आता महाजनांकडून जशास तसं उत्तर; म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या रेसमधला माणूस असा...
Nagarparishad Election Result: उद्याची मतमोजणी रद्द; हायकोर्टाचा मोठा निर्णय, आता काय परिणाम होणार? जाणून घ्या सविस्तर
उद्याची मतमोजणी रद्द; हायकोर्टाचा मोठा निर्णय, आता काय परिणाम होणार? जाणून घ्या सविस्तर
Nagarparishad Election Result: निकालाची तारीख पुढे जाताच देवेंद्र फडणवीस प्रचंड नाराज, म्हणाले, 'निवडणूक आयोगाचे वकील...'
निकालाची तारीख पुढे जाताच देवेंद्र फडणवीस प्रचंड नाराज, म्हणाले, 'निवडणूक आयोगाचे वकील...'
Mahad Nagarparishad Election: सुनील तटकरेंनी हल्ला करायला लोकं पाठवली, माझ्यावर रिव्हॉल्व्हर रोखली, कार्यकर्त्याने चपळाई दाखवत.... विकास गोगावलेंनी स्टार्ट टू एंड सगळं सांगितलं
माझ्या कार्यकर्त्याने रिव्हॉल्व्हर हिसकावली नसती तर मला गोळी लागली असती, भरत गोगावलेंच्या मुलाचा खळबळजनक दावा
Embed widget