Pune Crime: पुण्यातील 'त्या' पोलिसांवर कारवाईचा बडगा; आयटी अभियंता तरुण-तरुणीला धमकावत 10 हजार रुपये उकळण भोवलं, तिघांचं निलंबन
Pune Crime News : तरुण तरुणीला शारीरिक संबंधांच्या रॅकेटमध्ये अडकवतो, अशी धमकी (Crime News) देणाऱ्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारत या पोलिसांचे अखेर निलंबन करण्यात आले आहे.

Pune Crime News : तरुण तरुणीला शारीरिक संबंधांच्या रॅकेटमध्ये अडकवतो, अशी धमकी (Crime News) देणाऱ्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारत या पोलिसांचे अखेर निलंबन करण्यात आले आहे. पुण्यातील (Pune Police) वाघोली पोलीस ठाण्यातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर हि कारवाई (Pune Crime News) करण्यात आली आहे. शारीरिक संबंधांच्या रॅकेटमध्ये अडकवण्याची धमकी देऊन आयटी अभियंता तरुण-तरुणीकडून 10 हजार रुपये उकळले होते. या प्रकरणी पोलीस हवालदार किरण अब्दागिरी, पोलीस शिपाई गणेश खाडे आणि किरण कांबळे अशी निलंबित कर्मचाऱ्यांचे नावे आहेत.
दरम्यान, या प्रकरणी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासमोर तक्रार केल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची शहानिशा करत तपास केला. तपासाअंती या तीनही पोलिसांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आलं आहे. एकंदरीत या प्रकरणावरून पोलीस दलासह परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.
Pune Crime: पुणे महापालिकेत महिला अधिकारी यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ
दुसरीकडे, पुणे महापालिकेत महिला अधिकारी यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. सांस्कृतिक विभागाचे उपायुक्त आशा राऊत यांच्या अंगावर धावून शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी कविता पटेकर यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र महापालिकेत वरिष्ठ अधिकारीच असुरक्षित असल्याचे प्रकरण समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. एक महिना झाले कामा संदर्भात फाइल असून त्यावर आशा राऊत यांनी कार्यवाही केली नाही, असा आरोप कविता पटेकर यांनी केला आहे.
Pune Crime: उलटीचा बहाना करून महिलेने सात लाखांचे सोन्याचे दागिने चोरले, महिलेला अटक
दरम्यान उलटीचा बहाना करून महिलेने सात लाखांचे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील पीएमपीएल बस मधील हि घटना असून वानवडी पोलिसांनी या प्रकरणी दागिने चोरणाऱ्या महिलेला अटक केली आहे. ननिता कांबळे असं 37 वर्ष अटक करण्यात आलेल्या महिलेच नाव आहे. पीएमपी बसमध्ये 30 मार्चला रात्री दीडच्या सुमारास वैदूवाडी परिसरात हि घटना घडली होती. महिला आणि तिचा पती 30 मार्चला रात्री दीडच्या सुमारास हडपसर ते चिंचवडगाव असा पीएमपीएमएल बसमधून प्रवास करत होते. बसमधील गर्दीचा फायदा दुसऱ्या महिलेने म्हणजेच ननिता तिने घेतला आणि उलटीचा बहाना करून बसमधून खाली उतरताना पर्स मधली चैन उघडून सोन्याच्या दागिन्यांची छोटी पर्स चोरून नेली. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. महिलेला शोधून पोलिसांनी अटक केली.





















