पुणे: पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे सुरू झालेले मृत्यूचे तांडव थांबत नसून सारे शहरच हादरून गेले आहे. एकामागून एक सुरू असलेल्या मृत्यूसत्रामुळे परिसरात शोककळा (Pimpri Crime liquor poisoning) पसरली आहे. आनंदवन, काटेवस्ती, संजयनगर, आझाद चौक आणि जय महाराष्ट्र चौक या परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून, परिसरात भीतीचे वातावरण आहे. या दारुकांडाची व्याप्ती आता समोर येऊ लागली आहे.
Pimpri Crime liquor poisoning: अधिक नफा कामवण्याच्या उद्देशाने त्यामधे मिथेनॉल मिसळले
मिळालेल्या माहितीनुसार, उरळी कांचनमधील राधेशाम प्रजापती वय ३५ हा दारु तयार करण्याचे काम करतो. योगेश वानखेडे वय २३ हा प्राजपतीकडून दारु खरेदी करेदी करुन पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील वेगवेगळ्या दारु गुत्त्यांवर त्या दारुची विक्री करतो. योगेश वानखेडे हा दारु विक्री करणारा सराईत गुन्हेगार आहे. मात्र यावेळी योगेश वानखेडेने प्रजापतीकडून दारु खरेदी केल्यानंतर अधिक नफा कामवण्याच्या उद्देशाने त्यामधे मिथेनॉल मिसळले. मिथेनॉलमुळे दारुचे प्रमाण दुप्पट झाले, ज्यामुळे वानखेडेचा नफा वाढणार होता. मात्र यावेळी मिथेनॉल नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात मिसळले गेले आणि ती दारु विषारी बनली, आणि अनेकांचा जीव घेणारी ठरली.
Pimpri Crime liquor poisoning: चिंचवड पोलीसांनी सहा तर पुणे पोलिसांनी दोन आरोपींना केली अटक
वानखेडेने ती दारु पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडीत दारु गुत्ता चालवणाऱ्या कर्नलसिंह विरखा आणि गुरमितसिंह विरखा या बापलेकांना विकली. अनेकांच्या मृत्युला हा गुत्ता कारणीभुत ठरला. योगेश वानखेडेने त्याच्याकडील दारूच पुण्याच्या खडकी भागातील कल्पेश अग्रवाल आणि पुण्यातील वडारवाडी भागातील अरिहंत धोत्रे यांना देखील विकली. त्याचबरोबर पुण्याच्या हडपसर आणि काळेपडळ भागात दारु गुत्ता चालवणाऱ्या आकाश जाधव आणि अशोक हांडे यांना विकली, ज्यामुळे हडपसर भागात देखील मृत्यू झाले. पिंपरी चिंचवड पोलीसांनी सहा तर पुणे पोलिसांनी दोन अशा ऐकुण आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडमधे ८ तर पुण्यात ५ अशा एकुण १३ मृत्युंची नोंद झाली आहे. मात्र स्थानिकांच्या मते मृत्युचा आकडा कितीतरी जास्त आहे. उरळी कांचन हे पुणे ग्रामीण पोलीसांच्या हद्दीत येतं. त्यामुळे ही घटना पुणे ग्रामीण पोलीस, पुणे शहर पोलीस आणि पिंपरी चिंचवड शहर पोलीस या तिघांच अपयश मानलं जातं आहे.
Pimpri Crime liquor poisoning: आरोपींची नावे
१ . योगेश वाशखेडे २. राधेशाम प्रजापती 3. कर्नलसिंह विरखा4. गुरमितसिंह विरखा5. कल्पेश अग्रवाल 6. अरिहंत धोत्रे 7. आकाश जाधव 8. अशोक हांडे
Pimpri Crime liquor poisoning: या मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या प्रकरणात माझं पुणे पोलीस आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे. कुठल्या ठिकाणी विषारी दारू तयार झाली हे पोलिसांनी शोधून काढलेले आहे. याच्या पाठीमागे जे काही लोक आहेत, त्यांना अटक करण्यात आलेली आहे. आणखी काही लोक यात असू शकतात. ते शोधण्याचे काम सध्या सुरू आहे. ज्यांची प्रकृती गंभीर आहे त्यांना उपचार करून वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही घटना अत्यंत गंभीर आहे. ज्या ठिकाणी हे सगळं तयार झालं त्याच्या पाठीमागे कोण-कोण आहेत हे पोलीस शोधून काढत आहेत. आतापर्यंत आठ लोकांना अटक झाली आहे. अजून काही लोकांना अटक होऊ शकते. या प्रकरणातील संपूर्ण साखळी शोधून त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल. कारण ही एक प्रकारे हत्याच आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
Pimpri Crime liquor poisoning: तोंडाला फेस, लक्षणे सारखीच
दुसऱ्या घटनेत, अकबर अजीम खान पठाण यांना तोंडातून फेस येत असल्याने बुधवारी रात्री 'वायसीएम'मध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, गुरुवारी दुपारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ते गेल्या १५ वर्षांपासून दारू पीत असल्याचे नातेवाइकांनी सांगितले.तिसऱ्या घटनेत, राजेश राजपूत गुरुवारी सकाळी अचानक बेशुद्ध पडल्याने त्यांना रुग्णालयात आणले; पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांना दोन मुली असून ते बँक रिकव्हरीचे काम करत.गुरुवारी रात्री आनंद निकाळजे आणि आनंद देसाई या आणखी दोघांचा मृत्यू झाला. लागोपाठ झालेल्या पाच मृत्यूंमुळे परिसरात शोककळा पसरली. या पाचही मृतदेहांचे वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
