पुणे : लंडनला पसार झालेला पुण्यातील गुंड निलेश घायवळला (Nilesh Ghaywal) पासपोर्ट कुठून मिळाला याची माहिती आता समोर आली आहे. पुण्यात अनेक गंभीर गुन्हे नोंद असल्याने निलेश घायवळने अहिल्यानगरमधील बनावट पत्ता देऊन पासपोर्ट मिळवल्याची माहिती आहे. पण त्याची पार्श्वभूमी न तपासता अहिल्यानगर पोलिसांनी (Ahilyanagar Police) त्याला पासपोर्टसाठी संमती दिलीच कशी असा प्रश्न आता उपस्तित होत आहे.
पुण्यातील कोथरुडमध्ये 17 सप्टेंबर रोजी दोन निरपराध नागरिकांवर गोळीबार करण्यात आला होता. एकावर बंदुकीने तर दुसऱ्यावर कोयत्याने हल्ला केला होता. निलेश घायवळच्या गुंडांनी हा हल्ला केल्याचं समोर आलं. त्यानंतर घायवळ आणि त्याच्या इतर सहा साथिदारांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. मात्र या दरम्यान, निलेश घायवळ लंडनला पसार झाल्याचं उघड झालं.
Nilesh Ghaywal Case : अहिल्यानगर पोलिसांची पासपोर्टसाठी संमती
लंडनला पसार झालेल्या गुंड निलेश घायवळने पासपोर्ट मिळवण्यासाठी अहिल्यानगरमधील पत्ता दिल्याचं समोर आलं. पुण्यात त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे नोंद असल्याने पासपोर्ट मिळण्यास अडचण येऊ शकतात हे ओळखून घायवळने पासपोर्ट मिळवण्यासाठी नगरमधील बनावट पत्त्याचा उपयोग केला.
नगरमधील कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गौरी घुमटानंदी बाजार, कोतवाली, माळीवाडा रोड हा पत्ता घायवळने पासपोर्ट मिळवण्यासाठी वापरल्याचं उघड झालं. त्यामुळे नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यातील पोलिसांनी निलेश घायवळचा गुन्हेगारी इतिहास न तपासताच पासपोर्टसाठी संमती कशी दिली हा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे नगर पोलीस आता वादात सापडू शकतात. नगरमधून पासपोर्ट मिळवण्यासाठी घायवळला कोणाचा वरदहस्त लाभला हा प्रश्नदेखील यामुळे उपस्थित होत आहे.
Nilesh Ghaywal Gang MCOCA : मकोका अंतर्गत कारवाई
पुण्यातील कोथरुडमधे झालेल्या गोळीबार प्रकरणात कुख्यात गुंड निलेश घायवळवर मकोका कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र निलेश घायवळ लंडनला पळून गेल्याच पोलीसांच्या तपासात समोर आलं. हत्या, खंडणी, अपहरण, मारामारी यासारखे गंभीर गुन्हे नोंद असताना घायवळला पासपोर्ट मिळाला कसा असा प्रश्न उपस्थित होत होता.
Nilesh Ghaywal Escape To London : लंडनमध्ये घर घेतल्याची माहिती
याबाबत माहिती देताना घायवळने पासपोर्ट आपल्याकडे जमाच केला नाही असं पुणे पोलिसांनी म्हटलं होतं. त्यांच्याबाबत लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली असून भारतात परत येताच त्याला अटक करण्यात येईल अस पोलिसांनी म्हटलंय. निलेश घायवळने गुन्हेगारी कृत्यामधुन खूप मोठ्या प्रमाणात पैसा कमावला असून त्यातून त्याने लंडनमध्ये घर घेतल्याची माहिती आहे. तसेच त्याचा मुलगा लंडनमध्ये शिक्षण घेत असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
ही बातमी वाचा: