पुणे : पुण्यातील नसरापूर येथे 1 मे रोजी घडलेल्या साडेतीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणावरून (Pune Nasrapur Bhor Crime) संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. या प्रकरणातील आरोपी सध्या पोलिसांच्या अटकेत असून त्याला 7 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेतील पीडितेच्या मृत्यूबाबत ससून रुग्णालयाने प्राथमिक अहवाल सादर केला आहे. तर आरोपीने चिमुकलीच्या तोंडात (Pune Nasrapur Bhor Crime) गोळा कोंबून अत्याचार केल्याचे पोस्टमार्टममध्ये अहवालात उघड झाले आहे. त्यानंतर तिचा मृत्यू झाल्याची खात्री करण्यासाठी आरोपीने तिच्या छातीत जोरदार बुक्की मारल्याचेही वैद्यकीय अहवालात समोर आले आहे. त्याचबरोबर ज्या गोठ्यामध्ये चिमुरडीवर अत्याचार करून तिला संपवलं त्या ठिकाणी आरोपी काही दिवसांपासून राहत होता अशी माहिती समोर आली आहे.(Pune Nasrapur Bhor Crime)

Continues below advertisement

Pune Nasrapur Bhor Crime : अत्याचार केला त्याच गोठ्यात आरोपी चार ते सहा दिवस राहिला

नसरापूर अत्याचार प्रकरणातील पोलीस तपासात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या गोठ्यात आरोपी भीमराव कांबळेने चिमुकलीवर अत्याचार केला त्याच गोठ्यात भीमराव कांबळे चार ते सहा दिवस राहिला होता. तिथे जवळच विटा उचलण्याचं काम मिळाल्यामुळे भीमराव कांबळेने त्या गोठ्यात स्वतःची कपडे आणि साहित्य ठेवलं होतं. तीन दिवस त्या ठिकाणी भीमराव कांबळे विटा उचलण्याचं काम करत होता त्याच ठिकाणी ती चिमुकली खेळत होती. नराधम आरोपी भीमराव कांबळेची त्या चिमुकलीवर अगोदर पासूनच नजर होती. ज्या दिवशी विटा उचलण्याचं काम संपलं त्यादिवशी भीमराव कांबळे चिमुकलेला गोठ्यात घेऊन गेला. गोठ्यात घेऊन जाण्यापूर्वी चिमुकलीला गाठी शेव खायला दिली. त्यानंतर त्याने चिमुरडीला गोठ्यात नेऊन अत्याचार केला, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Pune Nasrapur Bhor Crime)

Pune Nasrapur Bhor Crime : पुणे ग्रामीण पोलीसांनी केली मध्यरात्री घटनास्थळाची पाहणी

नसरापूर प्रकरणातील आरोपी भिमराव कांबळेला सोबत घेऊन पुणे ग्रामीण पोलीसांनी मध्यरात्री घटनास्थळाची पाहणी केली. चिमुकली नेमकी खेळत कोठे होती, चिमुकलेला आरोपीने कुठून सोबत घेतलं, गाईच्या गोठ्यात नेमका अत्याचार कुठे केला? याबाबत आरोपीला घटनास्थळावर नेऊन पोलिसांनी माहिती घेतली. ग्रामस्थ संतप्त असल्याने भीमराव कांबळेला रात्रीच घटनास्थळी ग्रामीण पोलीस घेऊन गेले.

Continues below advertisement

Pune Nasrapur Bhor Crime : पुण्यातील नसरापूरमधील नेमकं प्रकरण काय? 

सुट्टीसाठी आजीच्या घरी आलेली 4 वर्षांची चिमुकली अंगणात खेळत होती. त्यावेळी 1 मे रोजी 65 वर्षांच्या आरोपीने तिला गोठ्यात नेलं. तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. एवढंच नाहीतर तिला दगडाने ठेचून तिची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली झाकून ठेऊन पळ काढला. इतकं गंभीर कृत्य करूनही या नराधमाला त्याचा जराही पश्चाताप झालेला नाही. ग्रामस्थांनी त्याला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं.