एक्स्प्लोर

Pune Nagpur Dj : नियमांचे उल्लंघन, कायद्याचा वचक; पुण्यात 10 दहीहंडी मंडळांवर गुन्हे. तर 116 मंडळांवर न्यायालयीन खटले, नागपुरातही ध्वनिप्रदूषणप्रकरणी तीन गुन्हे दाखल

Pune Nagpur Dj : पुणे शहरातील काही दहीहंडी मंडळांनी नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणी आता कारवाईचा बडगा उगारला आहे. दुसरीकडे नागपुरात शोभायात्रेत ध्वनिप्रदूषण झाल्यानं गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Nagpur Dj : गणेशोत्सव आणि आगामी सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी वाजणाऱ्या डीजेला आणि रहदारीला विरोध करत पुण्यातील सजग नागरिक असलेल्या विद्यानंद बापट (Vidyanand Bapat) यांनी ठाम भूमिका घेतली. अशातच त्यांच्या या भूमिकेचं समार्थन आणि विरोधाचा सूर सध्या राज्यात ऐकू येतो आहे. असे असताना सण उत्सवातील डीजे आणि डॉल्बी बंदी बाबत प्रशासनाने ठोस नियम घालून दिले आहेत. तसेच नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा देखील देण्यात आला आहे. असे असतांना पुणे शहरातील (Pune Crime) काही दहीहंडी मंडळांनी नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणी आता कारवाईचा बडगा उगारला आहे. पुण्यात (Pune)10 दहीहंडी मंडळांवर गुन्हे (Pune Crime) दाखल करण्यात आले आहे. तर 116 मंडळांवर न्यायालयीन खटले दाखल करण्यात आले आहे.

Pune Crime News : कारवाईत चार प्लाझ्मा, चार प्रेशर मिडसह 6 ध्वनियंत्रणा जप्त

दरम्यान, पुणे पोलिसांनी केलेल्या या कारवाईत चार प्लाझ्मा, चार प्रेशर मिडसह 6 ध्वनियंत्रणा जप्त करण्यात आले आहे. दहीहंडीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर ही कारवाई करण्यात आली आहे. लाऊडस्पिकरच्या कर्णकर्कश आवाजाला पुणेकरांचा वाढता विरोध आणि पोलिसांनी घालून दिलेली ‘चार बेस, चार टॉप’ची मर्यादा ओलांडणाऱ्या मंडळांवर आता कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. पुणे शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या परिमंडळ एकच्या हद्दीत सर्वाधिक म्हणजे 55 मंडळावर खटले दाखल करण्यात आले आहेत. दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी शहरातील तब्बल 1 हजार 100 मंडळांच्या ध्वनीच्या तीव्रतेचे पातळी तपासली होती. या नोंदींचे परीक्षण करून निर्धारित ध्वनिमर्यादेचे उल्लंघन झाल्यामुळे संबंधित मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Pune Crime : पुणे शहरातील परिमंडळ व दाखल खटले

परिमंडळ 1: 55

परिमंडळ 2: 23

परिमंडळ 3: 10

परिमंडळ 4: 0

परिमंडळ 5: 0

परिमंडळ 6: 27

परिमंडळ 7: 1

Nagpur Crime: विश्व हिंदू परिषदेच्या शोभायात्रेत ध्वनिप्रदूषण; वेगवेगळ्या कारवाईत तीन गुन्हे दाखल

दुसरीकडे नागपुरात विश्व हिंदू परिषदेच्या शोभायात्रेत ध्वनिप्रदूषण झाल्यानं सितांबर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर इतर दोन वेगवेगळ्या कारवाईत एकूण तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. नागपूर शहरात डीजे आणि विविध साऊंड सिस्टिमवर बंदी असतानाही विहिंपच्या शोभायात्रेत ध्वनिप्रदूषण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनादिना निमित्त रविवारी शहरात शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेत निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाजात डॉल्बी वाजवण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासणीत आढळले. परिणामी सीताबर्डी पोलिसांनी या प्रकरणात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.

Nagpur News : नागपूर शहरात ध्वनिप्रदूषणप्रकरणी झालेली ही पहिलीच कारवाई

दरम्यान, पहिल्या कारवाईत वाहनावरील साऊंड सिस्टिम तब्बल 98.6 डेसिबल आवाजात वाजत असल्याचे आढळले. याप्रकरणी महाल येथील सागर मोरेश्वर बारसिंगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या कारवाईत छोटी मशीद परिसरात साऊंड सिस्टिमचा आवाज 101.5 डेसिबल असल्याचे तपासणीत समोर आले. या ठिकाणी लेझर बीमचाही वापर करण्यात आल्याने अजय सोमकुंवर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसऱ्या कारवाईत पकोडे गल्ली परिसरात साऊंड सिस्टिम 94.7 डेसिबल आवाजात वाजवण्यात येत असल्याचे आढळले. या ठिकाणीही लेझर बीमचा वापर करण्यात आल्याने अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्तांनी डीजे, डॉल्बी, प्लाझ्मा आणि प्रेशर मिड साऊंड सिस्टिमच्या वापरावर बंदी घातली आहे. बीम लाईट आणि लेझर बीम लाईटच्या वापरावरही पोलिसांनी निर्बंध लागू केले आहेत. बंदीनंतर नागपूर शहरात ध्वनिप्रदूषणप्रकरणी झालेली ही पहिलीच कारवाई असल्याची माहिती समोर आली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime Malad: अंमली पदार्थाचा ओव्हरडोस, तडफडणाऱ्या तरुणाने पाणी मागितलं, झिंगलेल्या मित्रांनी दारु पाजली अन्... मालाडच्या आप्पा पाड्यातील भयानक व्हिडीओ
अंमली पदार्थाचा ओव्हरडोस, तडफडणाऱ्या तरुणाने पाणी मागितलं, झिंगलेल्या मित्रांनी दारु पाजली अन्... मालाडच्या आप्पा पाड्यातील भयानक व्हिडीओ
Jalgaon Accident News: आजोबांच्या श्राद्धासाठी बहिणीला आणायला निघाला, वाटेतच काळाचा घाला; कंटेनरच्या धडकेत 30 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
आजोबांच्या श्राद्धासाठी बहिणीला आणायला निघाला, वाटेतच काळाचा घाला; कंटेनरच्या धडकेत 30 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
Raigad Crime News: 'मी जीवन संपवतोय', पत्नीला शेवटचा मेसेज पाठवला, मोबाईल बंद केला अन्...; विठूरायाच्या भक्ताने टकमक टोकावरून उडी मारून जीवन संपवलं
'मी जीवन संपवतोय', पत्नीला शेवटचा मेसेज पाठवला, मोबाईल बंद केला अन्...; विठूरायाच्या भक्ताने टकमक टोकावरून उडी मारून जीवन संपवलं
Paithan Accident : भीषण अपघात! पैठणमध्ये एसटी बस-दुचाकीची धडक, बापलेकीसह एका नातेवाइकाचा जागीच दुर्दैवी अंत
भीषण अपघात! पैठणमध्ये एसटी बस-दुचाकीची धडक, बापलेकीसह एका नातेवाइकाचा जागीच दुर्दैवी अंत
Advertisement

व्हिडीओ

Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
Raj Thackeray Uddhav Thackeray Mumbai Morcha: बाळासाहेब थोरात पुढे, राज आणि उद्धव ठाकरे मागच्या सीटवर; तिन्ही नेते एकाच गाडीत बसले तेव्हा...VIDEO
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'वृत्तपत्रातील बातमीवर बोलताय..' सुप्रीम कोर्टाचा ज्ञानेश कुमारांविरोधात तत्काळ कारवाईस नकार, अंतरिम आदेश सुद्धा नाही, निवडणूक आयोगाला नोटीस
'वृत्तपत्रातील बातमीवर बोलताय..' सुप्रीम कोर्टाचा ज्ञानेश कुमारांविरोधात तत्काळ कारवाईस नकार, अंतरिम आदेश सुद्धा नाही, निवडणूक आयोगाला नोटीस
Chhatrapati Sambhajinagar Drought: पाण्याची वाट पाहता पाहता पीक करपलं; शेततळी कोरडी, विहिरींनी तळ गाठला, संभाजीनगरच्या गावागावांमध्ये दुष्काळाचा दाह सोसवेना
पाण्याची वाट पाहता पाहता पीक करपलं; शेततळी कोरडी, विहिरींनी तळ गाठला, संभाजीनगरच्या गावागावांमध्ये दुष्काळाचा दाह सोसवेना
Satara News: लहान भावाचा आणि बहिणीचा टीव्हीवरुन वाद, भांडणात लेक शिक्षक बापावर अरे तुरे करत बॅट घेऊन धावली, संतापलेल्या बापानं त्याच बॅटने लेकीला संपवलं, साताऱ्यातील थरकाप
लहान भावाचा आणि बहिणीचा टीव्हीवरुन वाद, भांडणात लेक शिक्षक बापावर अरे तुरे करत बॅट घेऊन धावली, संतापलेल्या बापानं त्याच बॅटने लेकीला संपवलं, साताऱ्यातील थरकाप
Mumbai Crime Malad: अंमली पदार्थाचा ओव्हरडोस, तडफडणाऱ्या तरुणाने पाणी मागितलं, झिंगलेल्या मित्रांनी दारु पाजली अन्... मालाडच्या आप्पा पाड्यातील भयानक व्हिडीओ
अंमली पदार्थाचा ओव्हरडोस, तडफडणाऱ्या तरुणाने पाणी मागितलं, झिंगलेल्या मित्रांनी दारु पाजली अन्... मालाडच्या आप्पा पाड्यातील भयानक व्हिडीओ
Sanjay Raut: फडणवीसांच्या राजकारणाला उतरती कळा लागली, अमित शाह अंडरग्राऊंड झालेत; संजय राऊतांचा सडकून प्रहार
फडणवीसांच्या राजकारणाला उतरती कळा लागली, अमित शाह अंडरग्राऊंड झालेत; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Satej Patil: तर मग एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार निर्दोष कसे असू शकतात? त्यांना हटवून न्यायालयीन चौकशी करा अन्यथा केवळ फार्स; सतेज पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
Satej Patil: तर मग एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार निर्दोष कसे असू शकतात? त्यांना हटवून न्यायालयीन चौकशी करा अन्यथा केवळ फार्स; सतेज पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
Jantar Mantar Delhi Police: कोणी बसची हवा काढली, कोणी गाडीच्या चाव्या पळवल्या, इमर्जन्सी एक्झिट अन् काचा फोडून उड्या मारल्या, दिल्लीच्या जंतरमंतरवर जेन झीने पोलिसांना रडकुंडीला आणलं
कोणी बसची हवा काढली, कोणी गाडीच्या चाव्या पळवल्या, इमर्जन्सी एक्झिट अन् काचा फोडून उड्या मारल्या, दिल्लीच्या जंतरमंतरवर जेन झीने पोलिसांना रडकुंडीला आणलं
Girija Oak Photos: नॅशनल क्रश गिरीजा ओकचा ग्लॅमरस लूक; अभिनेत्रीने लाल ड्रेसमध्ये वेधलं लक्ष, हाय स्लिट गाऊनमध्ये दिसते सुरेख
नॅशनल क्रश गिरीजा ओकचा ग्लॅमरस लूक; अभिनेत्रीने लाल ड्रेसमध्ये वेधलं लक्ष, हाय स्लिट गाऊनमध्ये दिसते सुरेख
Embed widget