Pune : गेल्या काही दिवसांपासून शिक्षणाचे माहेर घर असलेल्या पुण्यात गुन्हेगारीनं डोके वर काढले आहे. अगदी मिसरूड न फुटलेल्या पोरांच्या हातात कोयते, तलवारी आणि इतर धारधार हत्यारे हातात दिसू लागलेत. शुल्लक कारणावरून ही तरुणाई आता थेट एकमेकावर हल्ले चढवत असल्याच्या अनेक घटना पुण्यातून समोर आल्यात. पूर्व वैमनस्यातून थेट काही तरुणांनी त्यांच्याच मित्रांवर कोयते उगरल्याची घटना पुण्यातील वडगाव शेरी मधून नुकतीच समोर आली आहे. दरम्यान, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात कुठलीही कोयता गॅंग नाहीय, असा दावा केलाय. 

कोयते हातात घेऊन दहशत माजवणे, तलवारीने परिसरात धुमाकूळ घालणे आणि गाड्यांची तोडफोड करणे असा गुन्हेगारीचा ट्रेण्ड सुसंस्कृत शहरात पाहायला मिळतोय. कोंढवा, हडपसर, येरवडा, वारजे पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे प्रकार मागील काही दिवसांपासून सर्रास सुरू आहेत. या सगळ्या घटनांमुळे शहरातील अनेक भागात भीतीचे वातावरण जणू लागलं आहे. 

वडगाव शेरी मध्ये बुधवारी झालेली घटना ही तर अगदी पुणे पोलिसांच्या एका महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या समोर घडली. यावेळी त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, खरा मात्र तो अप्याशी ठरला. कोयत्याने हल्ला करून अनेक तरुण जखमी होतायत तर सामान्य नागरिक ज्यांच्या काही एक संबंध नसला तरी सुद्धा त्यांच्यावर भीतीची टांगती तलवार कायम असल्याचं दिसून आलंय.  दुसऱ्या बाजूला, परिसरात आपलं वर्चस्व राहावं म्हणून काही तरुण तर सर्रास दुचाकी, चार चाकी गाड्यांची तोडफोड करताना दिसून येतात. 

उपाय काय ?

या सगळ्या घटनांमुळे पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह उभे राहतय. एका बाजूला पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी नुकतीच 100 टोळक्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र आता पोलीस आयुक्त रितेश कुमार हे वाढते कोयता हल्ले चे प्रकरणे कसे रोखणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. दुसऱ्या बाजूला, या घटनांचा दोष फक्त पोलिसांवर देऊन चालणार नाही, कारण कोयते घेऊन हल्ले करणारे अनेक जणं हे अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झालंय. त्यामुळे या मुलांवर समुपदेशन आणि विशेष म्हणजे पालकांनी त्यांच्या पाल्यांवर लक्ष देणे तितकेच महत्वाचे आहे.

पुण्यात कोयता, कुऱ्हाड घेऊन दहशत माजवण्याचा पॅटर्न

गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातील अनेक परिसरात रोज एक भाई आणि त्यांच्या टोळ्या तयार होताना दिसतायत. वय अवघे 18- 25 , अंगावर एखादा टी शर्ट टाकायचा, फाटलेली पँट घालायची, खिशात रुमाल, तोंडावर मास्क आणि हातात कोयता अशी ओळख या नवीन भाई लोकांची तयार झाली आहे. त्यामुळे पुण्यात नव्या भाईगिरीचा उदय झाला आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. पुण्यातली भाईगिरी काही नवीन नाही पण कोयता, कुऱ्हाड घेऊन दहशत माजवण्याचा पॅटर्न सध्या अनेक महिन्यांपासून शहरातील मध्यवर्ती भागात पाहायला मिळतोय.