Pune Crime News : पुण्यातून अपघताची एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यात काल रात्री एका महिला कॉन्स्टेबलला नाकाबंदी दरम्यान उडवल्याची घटना घडली आहे. यात भरधाव  वेगाने आलेल्या चार चाकी कारने नाकाबंदीसाठी तैनात असणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला धडक दिली आहे. पुणे स्टेशन परिसरात काल रात्रीच्या सुमारास ही घटना घडलीय. या अपघतानंतर अज्ञात चार चाकी वाहनचालक घटनास्थळावरुन पळून गेला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून संशयित आरोपीचा ही शोध घेत आहे. मात्र हा घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.   


मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात रात्री गस्तीसाठी तैनात असणाऱ्या महिला पोलिस जखमी झाली आहे. दीपमाला नायर असं जखमी महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. दरम्यान, पोलिस सीसीटिव्हीच्या माध्यमातून आरोपीचा तपास करत आहेत. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकावर बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून पोलीस वाहन चालकाचा तपास करत असल्याची माहिती झोन-2 च्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली आहे.


बाईकच्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू


दरम्यान, अशीच एक अपघाताची बातमी चंद्रपुर जिल्ह्यातून पुढे आली आहे. चंद्रपूर शहरातल्या बाबू पेठ उड्डाणपुलावर एका बाईकच्या झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झालाय, तर एक तरुण गंभीर जखमी झालाय. विशेष म्हणजे हा बाबूपेठ उड्डाणपूल अलीकडेच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. मात्र या उड्डाण पुलावर हा भीषण अपघात झाल्याने शहरात या अपघाताची मोठी चर्चा आहे. साहिल ढवस आणि आयरन मेश्राम अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावं असून हे तिन्ही तरुण बाबूपेठ कडून चंद्रपूर शहराकडे येत असताना पुलाच्या कठड्याला ही बाईक जोरदार आढळून हा अपघात झाला. मात्र हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अजून कुठलाही ठोस निष्कर्ष काढण्यात आलेला नाही. 


 इतर महत्वाच्या बातम्या