पुणे : पुण्यातील 19 वर्षीय तरुणीच्या हत्येचे गूढ अखेर उलगडले असून पोलिसांनी (Police) आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे मुलीच्या वडिलांनी आणि काकांनीची मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार तपासातून उघडीकीस आला आहे. सातारा (Satara) जिल्ह्याच्या शिरवळ-राजेवाडी रस्त्यालगत 14 सप्टेंबर रोजी हर्षदा जाधव या युवतीचा मृतदेह (Crime news) आढळून आला होता, ती युवती पुण्यातील रहिवाशी असल्याची माहितीही तपासून समोर आली. 

Continues below advertisement

सातारा जिल्ह्याच्या शिरवळ-राजेवाडी रस्त्यालगत 14 सप्टेंबर रोजी सापडलेल्या अनोळखी तरुणीच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. मयत तरुणी पुण्याची हर्षदा जाधव (19) असल्याचे निष्पन्न झाले असून, तिच्या त्रासाला कंटाळून कुटुंबीयांनीच हा खून केल्याचे समोर आले. जेवणाच्या बहाण्याने गाडीतून घराबाहेर नेऊन डोळ्यात-तोंडात मिरची चटणी टाकून व श्वास रोखून सख्ख्या वडिलांनी आणि चुलत्यानेच तिचा निर्घृण खून केला होता. सलग 16 दिवस सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी संशयित वाहनाचा माग काढून दोन्ही आरोपींना शिरवळ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. मात्र, या घटनेनं पोलिसांच्या मनाचा थरकाप उडाला आहे. 

हर्षदा ही घरातील लोकांना शिवीगाळ करायची, वाईट मुलांसोबत रात्रभर बाहेर फिरायची, व्यसन करायची. घरातील लोकांना खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी द्यायची. तिच्या अशा वागण्याला आणि त्रासाला कंटाळून वडील आणि चुलत चुलत्यानेचा तिचा खून केल्याचे उघडकीस आले. हर्षदाला हॉटेलला जेवायला जायचं असल्याचं सांगून वडिल आणि चुलत्याने कारमध्ये बसवलं. त्यानंतर, तिच्या डोळ्यात आणि तोंडात चटणी म्हणजेच लाल मिर्ची घालून हाताने तोंड नाक दाबून तिचा खून केला. त्याच गाडीतून तिचा मृतदेह सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या हद्दीवर आणून टाकल्याचा घटनाक्रम तपासात उघडकीस आला आहे. या घटनेनं खळबळ उडाली असून पोलिसांनी मुलीच्या वडिलांना आणि चुलत्याला अटक केली आहे. 

Continues below advertisement

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळापासून पुणे, भोर बाजुकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहाणी केली. भोर, पुणे, कापूरहोळ, नसरापूर, सातारापुणे हायवे भागात खबऱ्याकडून माहिती काढली. तांत्रिक तपासाद्वारे वाहनाचा माग काढुन संशयित आरोपी निष्पन्न करण्यात पोलिसांना यश आलं. 

हेही वाचा

जेलमधून वाल्मीक कराडचा सुग्रीव कराडला फोन; मृतदेह पोलीस ठाण्यात ठेवा, टाकीवर चढा, पण...!"; बजरंग सोनवणेंनी ऐकवली ऑडिओ क्लिप, सगळंच काढलं