पुणे : पुण्यातील पर्वती परिसरात (Pune Parvati Crime News) एक धक्कादायक घटना समोर आली. 70 वर्षीय आजोबाने सख्ख्या 9 वर्षांच्या नातीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना घडली आहे. शेजाऱ्यांना मुलीचा आरडाओरडा ऐकू आल्यानंतर ते घराजवळ पोहोचले आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या नराधम आजोबावर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. (Pune Parvati Crime News) तर पर्वतीत अत्याचाराचा प्रयत्न  झालेल्या मुलीच्या ओठांवर आणि छातीवर  मारहाणीच्या मोठ्या जखमा असल्याची माहिती समोर आली आहे. 70 वर्षे आजोबांने नऊ वर्षीय नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता, या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक करण्यात आली आहे. या पीडित मुलीच्या तोंडावर ओठांना आणि छातीवर जखमा आढळून आल्या आहेत. अत्याचाराचा प्रयत्न करतेवेळी नराधम आजोबाने मुलीला नखे मारले असावेत अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.(Pune Crime Parvati Case)

Pune Parvati Crime News : चिमुकलीवरील अनर्थ कसा टळला?

सदर प्रकरणी चिमुकलीवरील अनर्थ कसा टळला याबाबत माहिती समोर आली आहे. नातू आणि नात आरोपी आजोबाला भेटण्यासाठी आले होते. आरोपीने नातूला पैसे दिले आणि खाऊ खाऊन ये असं सांगितलं. नंतर आरोपीने नातीच्या अंगावरील कपडे काढले आणि स्वतःच्या अंगावरीलही कपडे काढले. आरोपी पत्र्याच्या घरात राहिला असल्याने एका महिलेचे लक्ष गेलं आणि हा सगळा प्रकार उघडकीस आला. (Pune Parvati Crime News)

Pune Parvati Crime News : पोलिसांनी काय सांगितलं? 

पर्वती पोलीस स्थानकाचे पोलीस निरिक्षक राजेंद्र सहाणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची माहिती दिली. काल (5 मे) रात्री 9.30 वाजता एक माहिती मिळाली की, एका आरोपीला लोकांनी पकडून ठेवलं होतं ज्याने स्वत:च्या नातीवर अत्याचार केल्याचा प्रयत्न केला. हा त्या मुलीचा सख्खा आजोबा आहे, जो 70 वर्षांचा आहे. त्याच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळाची प्रकृती चांगली असून तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलं आहे. सध्या परिस्थिती शांत आहे . पुढील कारवाई आम्ही करत आहोत, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

Pune Parvati Crime News : सदर घटनेनंतर नागरिकांचं पोलीस स्थानकाबाहेर ठिय्या आंदोलन

सदर प्रकार नागरिकांनी पाहिल्याने अनर्थ टळला. नागरिकांमुळे पीडितेची नरधमाच्या तावडीतून सूटका झाली. यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. मात्र आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत स्थानिकांनी पर्वती पोलीस स्थानकाबाहेर गर्दी केली. संतप्त नागरिकांनी पर्वती पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं. मोठ्या प्रयत्नानंतर पोलिसांनी नागरिकांना शांत केलं.

Pune Parvati Crime News : पुणे शहरात तीन महिन्यात पॉक्सोचे 50 गुन्हे दाखल 

पुणे शहरात तीन महिन्यात पॉक्सोचे 50 गुन्हे दाखल झालेले आहेत. शहरातील लैंगिक अत्याचारांच्या घटनांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. नसरापूर आणि पर्वती येथे घडलेल्या लैंगिक अत्याचार घटनाानंतर गुन्ह्यांची आकडेवारी समोर आली आहे. बहुतांश गुन्ह्यांमधील आरोपी ओळखीचे नातेवाईक किंवा शेजारी राहणारे आहेत. जानेवारी ते मार्चमध्ये विनयभंगाचे एकूण 149 गुन्हे दाखल झालेले आहेत.

Pune Parvati Crime News : शहरातील सीसीटीव्ही अनेक ठिकाणी नादुरुस्ती...

 शहरातील सीसीटीव्ही अनेक ठिकाणी नादुरुस्ती अवस्थेत आहेत. सर्वांचे ऑडिट करण्याचे महापौरांनी आदेश दिले आहेत. नसरापूर  घडलेल्या बालकावरील अत्याचार घटनेच्या पार्श्वभूमीवर महापौर यांचे प्रशासनाला आदेश दिले आहेत. शहरातील सरकारी शाळा सार्वजनिक ठिकाणी प्रमुख सेवक आणि पोलीस चौकामध्ये बसवण्यात आलेले सीसीटीव्ही नादुरुस्त असल्याचे निदर्शनास आले आहे. तातडीने या सर्वांचा ऑडिट करून कॅमेरे दुरुस्त करण्याचे आदेश महापौर मंजुषा नागपुरे यांनी प्रशासनाला दिले आहे.