एक्स्प्लोर

Pune Crime News: घरात घुसले, आमचे इनरवेअर तपासले, पोलिसांनी काय काय केले?, पुण्यातील तरुणींच्या आरोपाने खळबळ

Pune Crime News: पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात तीन दलित मुलींचा पोलिसांकडून छळ झाल्याचा आरोप केला जात आहे.

Pune Crime News: पुण्यातील कोथरुड (Kothrud News) पोलीस ठाण्यात तीन दलित मुलींचा पोलिसांकडून छळ झाल्याचा आरोप (Pune Crime News) केला जात आहे. छत्रपती संभाजीनगरमधील एका प्रकरणाच्या तपासासाठी या मुलींना कोथरुड पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. तेथील रिमांड रुममध्ये या मुलींचा पाच तास छळ करण्यात आला. यावेळी पोलिसांकडून जातीवाचक शेरेबाजी आणि मुलींचा विनयभंग करण्यात आल्याचा आरोप आहे. 

सदर प्रकरणी माध्यमांशी बोलताना एक तरुणी म्हणाली की, मुळात ही केस छत्रपती संभाजीनगरमधील होती. याप्रकरणी पोलीस आमच्या घरी आले होते. यावेळी पोलीस आम्हाला जातीवाचक, खासगी आयुष्याबाबत नको नको ते बोलले. तसेच आम्हाला बेदम मारहाण देखील केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. पोलिसांनी कोणतीही सूचना न देता किंवा कोणतेही वॉरंट नसताना आमच्या राहत्या घरी घुसले. त्यानंतर आमच्या घरातील बाथरुम, बेडरुममध्ये घुसले. यावेळी आमच्या इनरवेअरची देखील तपासणी केली, असा खळबळजनक आरोप तरुणीने केला आहे. आम्ही जाब विचारताच तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये चला, आम्ही दाखवतो, अशी धमकीही पोलिसांनी दिल्याचा आरोप तरुणीने केला. 

पोलिसांकडून अजूनही गुन्हा दाखल नाही-

पुण्यात कोथरूड पोलिसांकडून शिविगाळ आणि मारहाण झाल्याचा आरोप करून आंदोलन करणाऱ्या मुली अखेर रात्री साडेतीन वाजता परत गेल्या. मात्र मुलींच्या मागणीप्रमाणे अजूनही पोलिसांवर गुन्हा दाखल झालेला नाही. पीडित मुलींसह आमदार रोहित पवारांनी पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्याशी चर्चा केली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप, सुजात आंबेडकर, सुजात आंबेडकर यांच्यासह शहरातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र अप्पर पोलीस आयुक्त  मनोज पाटील आणि अतिरिक्त पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याशी चर्चा करूनही गुन्हा दाखल न झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. 

नेमकं प्रकरण काय?

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 23 वर्षीय विवाहित महिला आपल्या पतीकडून होणाऱ्या सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून पुण्यात आली होती. त्या मुलीला मदत केलेल्या तीन मुलींना स्थानिक पोलिसांकडून कोणतीही पूर्वसूचना न देता ताब्यात घेतलं गेलं. तसेच त्या महिलांवर पोलीस स्टेशनमध्ये जातीवाचक शिवीगाळ, मारहाण आणि लैंगिक अपमान केल्याचा आरोप मुलींनी केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील, संभाजीनगर पोलीस स्टेशनचे अमोल कामटे आणि छत्रपती संभाजीनगर येथील महिला कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे यांच्यावर थेट मारहाणीचे आरोप करण्यात आले आहेत.

संबंधित बातमी:

Sujat Ambedkar Pune Crime: सहकाऱ्यांना वाचवण्यासाठी पोलिसांनी अ‍ॅट्रोसिटीची तक्रार घेतली नाही, कोथरुडमध्ये दलित मुलींचा छळ, सुजात आंबेडकर संतापले

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: आदित्य ठाकरे यांना शिवसेना ठाकरे पक्षाच्या कार्याध्यक्ष पदाची धुरा देणार?, वर्धापनदिनी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता 
Maharashtra Live Blog Updates: आदित्य ठाकरे यांना शिवसेना ठाकरे पक्षाच्या कार्याध्यक्ष पदाची धुरा देणार?, वर्धापनदिनी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता 
Crime news Belgaum: बेळगावात धक्कादायक घटना, मुलगी दुसऱ्या जातीच्या प्रियकरासोबत पळून गेली, भावाने विष देऊन संपवलं
बेळगावात धक्कादायक घटना, मुलगी दुसऱ्या जातीच्या प्रियकरासोबत पळून गेली, भावाने विष देऊन संपवलं
Dhule News: धुळ्यात अविवाहित तरुणीचा गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने मृत्यू; रक्तदाब कमी झाला, झटके आले अन्...
धुळ्यात अविवाहित तरुणीचा गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने मृत्यू; रक्तदाब कमी झाला, झटके आले अन्...
Ashok Kharat and Anjali Damania: अशोक खरातला रुपाली चाकणकरांपेक्षाही जास्त फोनकॉल करणारा 'तो' सरकारी अधिकारी कोण; अंजली दमानियांचा खळबळजनक दावा
अशोक खरातला रुपाली चाकणकरांपेक्षाही जास्त फोनकॉल करणारा 'तो' सरकारी अधिकारी कोण; अंजली दमानियांचा खळबळजनक दावा

व्हिडीओ

Praful Hinge IPL : कोण आहे पहिलाच सामना गाजवणारा प्रफुल हिंगे? Special Report
Nagpur Shampoo Drugs : शाम्पूची बाटली, कोकेनचा फेस, तस्करीचा पर्दाफाश Special Report
Amravati Scandal : आरोपी अयान अहमदकडून किती जणींचं शोषण? भाजप आक्रमक Special Report
Ashok Kharat : भक्तांचे पॅनकार्ड, अफरातफरीचा रेकॉर्ड, प्रणिती शिंदेंचा काय म्हणाल्या? Special Report
Sanjay Raut On Anjali Damania : दमानियांना मुख्यमंत्री कार्यालयाची मदत, चांगला काम करत आहे, राऊतांचा निशाणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : अजित पवारांच्या घराबाहेरील ब्लॅक मॅजिकशी अशोक खरातचं कनेक्शन, ठाण्यातील हॉटेलमधून 34 सेकंदात पैशांचे 6 मोठे व्यवहार, अंजली दमानियांचा आरोप
अजित पवारांच्या घराबाहेरील ब्लॅक मॅजिकशी अशोक खरातचं कनेक्शन, ठाण्यातील हॉटेलमधून 34 सेकंदात पैशांचे 6 मोठे व्यवहार, अंजली दमानियांचा आरोप
MPSC परीक्षेत अंतिम निवड न झालेल्या उमेदवारांसाठी 'गुडन्यूज'; सरकारचा मोठा निर्णय, 'निपुण सेतू' उपक्रम
MPSC परीक्षेत अंतिम निवड न झालेल्या उमेदवारांसाठी 'गुडन्यूज'; सरकारचा मोठा निर्णय, 'निपुण सेतू' उपक्रम
Taxi And Rickshaw Licenses: मराठी लिहिता वाचता न येणाऱ्या रिक्षा अन् टॅक्सी चालकांचे लायसन्स होणार रद्द; राज्य सरकारच्या निर्णयाला रिक्षा, टॅक्सी चालक-मालक संघटनांचा विरोध
मराठी लिहिता वाचता न येणाऱ्या रिक्षा अन् टॅक्सी चालकांचे लायसन्स होणार रद्द; राज्य सरकारच्या निर्णयाला रिक्षा, टॅक्सी चालक-मालक संघटनांचा तीव्र विरोध
Supriya Sule son in Law: सुप्रिया सुळेंच्या होणाऱ्या जावयाच्या कंपनीसोबत राज्य सरकारचा आणखी एक करार, साडेपाच हजार कोटींची गुंतवणूक
सुप्रिया सुळेंच्या होणाऱ्या जावयाच्या कंपनीसोबत राज्य सरकारचा आणखी एक करार, साडेपाच हजार कोटींची गुंतवणूक
Jalgaon Crime News : 600 बनावट शिक्षकांची भरती अन् कोट्यवधींचा पगार लाटला; शालार्थ घोटाळ्यात 48 अधिकाऱ्यांना एसआयटीची नोटीस
600 बनावट शिक्षकांची भरती अन् कोट्यवधींचा पगार लाटला; शालार्थ घोटाळ्यात 48 अधिकाऱ्यांना एसआयटीची नोटीस
Sahar Shaikh Mumbra AIMIM: कैसा हराया...सहर शेखचं नगरसेवकपद धोक्यात; निवडणूक लढवताना चार महत्त्वाच्या शासकीय यंत्रणांची दिशाभूल, नेमकं प्रकरण काय?
कैसा हराया...सहर शेखचं नगरसेवकपद धोक्यात; निवडणूक लढवताना चार महत्त्वाच्या शासकीय यंत्रणांची दिशाभूल, नेमकं प्रकरण काय?
Beed Crime : बीडमध्ये पुन्हा गुंडगिरी उफाळली, टोळक्याकडून तरुणावर प्राणघातक हल्ला; शिवसेनेच्या माजी जिल्हाप्रमुखासह सात जणांवर गुन्हा दाखल
बीडमध्ये पुन्हा गुंडगिरी उफाळली, टोळक्याकडून तरुणावर प्राणघातक हल्ला; शिवसेनेच्या माजी जिल्हाप्रमुखासह सात जणांवर गुन्हा दाखल
4000 कोटींच्या 'रामायण'चा 'तो' अभिनेता, ज्याला 8 वर्षांपूर्वी कोणी ओळखतंही नव्हतं; मग 1200 कोटींच्या फिल्ममधून देशभरात गाजला, अन् मानधनच घेतो 100 कोटी
4000 कोटींच्या 'रामायण'चा 'तो' अभिनेता, ज्याला 8 वर्षांपूर्वी कोणी ओळखतंही नव्हतं; मग 1200 कोटींच्या फिल्ममधून देशभरात गाजला अन्...
Embed widget