Pune Crime News: आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थेत तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार; कीर्तनकार महिला व कुटुंबीयांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा
Pune Crime News: पीडितेने पाच जणांविरुद्ध अत्याचार, अपहरण, धमकी आणि जबरदस्तीने लग्न लावण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

Pune Crime News पुणे: आळंदी येथील केळगाव रस्त्यावर असलेल्या एका खासगी वारकरी शिक्षण संस्थेत तरुणीला डांबून तिच्यावर वारंवार बलात्कार (Pune Crime News) करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात एका कीर्तनकार महिला सहभागी असल्याचे समोर आले असून, पीडितेने पाच जणांविरुद्ध बलात्कार, अपहरण, धमकी आणि जबरदस्तीने लग्न लावण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. तसेच सखल मराठा समाजाकडून आळंदी पोलीस ठाण्यात पत्र देत कडक कारवाईची मागणी केली आहे.
नेमकं काय घडलं?
2 जून 2025 रोजी ती घरी एकटी असताना तिच्या ओळखीच्या एका महिलेने तिला शेताकडे जाण्याचे कारण सांगून घराबाहेर नेले. त्याचवेळी वाटेत काळ्या रंगाच्या इर्टिगा गाडीतून आलेल्या आण्णासाहेब आंधळे, प्रविण आंधळे आणि एका अनोळखी चालकाने तिचे जबरदस्तीने अपहरण केले. तिने आरडाओरड केली असता अॅसिड टाकण्याची धमकी देण्यात आली. नंतर तिला आळंदी येथील खासगी मुलींच्या वारकरी शिक्षण संस्थेत नेण्यात आले. तिथे आण्णासाहेब आंधळे, प्रविण आंधळे, कीर्तनकार सुनिता आंधळे आणि अभिमन्यु आंधळे यांनी तिला खोलीत डांबून ठेवले. फिर्यादीनुसार, या ठिकाणी आण्णासाहेब आंधळे यांनी तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली.
कीर्तनकार महिला व कुटुंबीयांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल-
सदर प्रकरणात पोलिसांनी आण्णासाहेब प्रल्हाद आंधळे, प्रविण प्रल्हाद आंधळे, अनोळखी वाहनचालक, सुनिता अभिमन्यु आंधळे आणि अभिमन्यु भगवान आंधळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींवर अपहरण, बलात्कार, धमकी देणे, जबरदस्ती आणि गुन्हेगारी कट रचण्याच्या गंभीर आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिगरेट न दिल्याच्या रागातून पुण्यात गुंडांनी फोडले दुकान-
उत्तमनगर परिसरात सिगरेट न दिल्यामुळे संतापलेल्या काही गुंडांनी हातात कोयते घेऊन एका दुकानावर हल्ला केला. त्यांनी दुकान फोडून रोख रक्कम चोरी केली. या धक्कादायक घटनेचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून, त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.



















