Pune Crime News: कारागृहाच्या भिंतींआड बसूनही आंदेकर टोळी (Andekar Gang) पुणे शहरात सक्रिय असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. टोळीच्या म्होरक्यांकडून पूर्ववैमनस्यातून शहरात हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याच्या गंभीर घटना पोलीस तपासात निष्पन्न झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे शहराचे पोलीस आयुक्त (Police Commissioner) अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी राज्याच्या कारागृह प्रशासनाला (Prison Administration) एक पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे आंदेकर पिता-पुत्रासह टोळीतील प्रमुख गुन्हेगारांवर कारागृहातच कडक निर्बंध घालण्याची मागणी पोलिसांनी केली आहे.
Pune Crime News: कारागृहातून टोळीयुद्धाचा कट आणि हल्ले
माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणातील आरोपींच्या नातेवाइकांना या आंदेकर टोळीकडून लक्ष्य केले जात आहे. गेल्या काही दिवसांत पुण्याच्या धनकवडी येथील बालाजी नगर आणि खडी मशीन चौक भागात दोन गंभीर घटना घडल्या. काही दिवसांपूर्वी अक्षय म्हस्के याच्यावर जीवघेणा हल्ला (Fatal Attack) करण्यात आला होता, ज्यामध्ये अक्षय सुदैवाने बचावला. या गुन्ह्यांची पाळेमुळे तपासली असता, हे सर्व प्रकार टोळीयुद्धातून (Gang War) सुरू असून आंदेकर टोळी कारागृहातूनच या सर्व हालचाली नियंत्रित करत असल्याचे समोर आले आहे. कारागृहात राहूनही ही टोळी पुणे शहरात वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडवून आणण्याचा प्रयत्न करत असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
Pune Crime News: पोलीस आयुक्तांच्या पत्रातील मुख्य मागण्या
टोळीच्या गुन्हेगारी कृत्यांना चाप लावण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारागृह प्रशासनाकडे खालील मागण्या केल्या आहेत.
- टोळीतील प्रमुख आरोपींना वेगळं ठेवा.
- नातेवाईक भेटींवर निर्बंध आणा. - कारागृहातून फोन करण्यास मज्जाव करा.
- न्यायालयीन तारखांना प्रत्यक्ष हजर न राहता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर करा.
Pune Crime News: मकोका अंतर्गत कारागृहात बंदिस्त
सध्या आंदेकर टोळीचा मुख्य आरोपी सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर हा धुळे येथील जिल्हा कारागृहात (Dhule District Jail) बंदिस्त आहे. तर त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर हा नंदुरबार येथील कारागृहात (Nandurbar Jail) आहे. या दोघांवरही खंडणी गोळा करणे (Extortion) आणि खून असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमुळे त्यांच्यावर 'महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा' म्हणजेच 'मकोका' (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आली असून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. कारागृहातून सुरू असलेली ही गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी आता पुणे पोलीस (Pune Police) ॲक्शन मोडमध्ये आले आहेत.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
