(Source: ECI | ABP NEWS)
Pune Crime Murlidhar Mohol: घायवळ, आंदेकर, मारण, टिपू पठाण सगळ्यांचा बंदोबस्त केला, पण पुणे पोलिसांना मुरलीधर मोहोळांच्या कार्यकर्त्याला मारहाण करणार आरोपी का सापडेना?
Pune Crime: पुणे पोलिसांनी घायवळ, आंदेकर, गजनान मारणे, टिपू पठाण यांच्यावर कारवाई करण्यात यश आले असले तरी मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाटच असल्याचे चित्र आहे.

Pune Crime News : पुण्यातील वाढती गुन्हेगारी हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. वारंवार घडत असलेल्या हत्या, मारहाण, गोळीबार आणि इतर घटनेने विद्येचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात (Pune Crime) नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न विचारण्याची वेळ पुणेकरांवर आली आहे. अशातच पुणे पोलिसांनी घायवळ, आंदेकर, गजनान मारणे, टिपू पठाण यांच्यावर कारवाई करण्यात यश आले असले तरी मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाटच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे रुपेश मारणे आणि बाब्या उर्फ श्रीकांत पवार यांना बेड्या ठोकण्यात पुणे पोलीस अपयशी ठरत आहे का? असा प्रश्न विचारला जातोय.
Pune Crime News : दोन आरोपींना बेड्या ठोकण्यात 9 महिन्यानंतरही पुणे पोलिसांना अपयश
मिळालेल्या माहितीनुसार, खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणातील दोन आरोपींना बेड्या ठोकण्यात 9 महिन्यानंतरही पुणे पोलिसांना अपयश आलं आहे. या प्रकरणातील रुपेश मारणे हा अजूनही मोकाट आहे. त्यामुळे पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. एकीकडे पुणे शहरात गजनान मारणे, टिपू पठाण, निलेश घायवळ, आंदेकर यांच्यावर एकामागून एक कारवाई केली जात आहे. मकोकापासून तर बॅंक अकाऊंट फ्रिज करतपर्यंत कारवाई केली जात असताना, फेब्रुवारीत कोथरुड परिसरातील हल्ल्याच्या दोन गुन्ह्यांत गजानन मारणे टोळीतील कुख्यात रुपेश मारणे आणि बाब्या उर्फ श्रीकांत पवार हे दोघे 8 महिन्यांपासून फरार आहेत. इतका काळ उलटूनही पोलिसांना ते सापडलेले नसल्याचे चित्र आहे.
Pune Police : आयुक्तांनी वारंवार गुन्हे आढावा बैठकीत सूचना
खासदार मुरलीधर मोहोळ यांनी फेब्रुवारीमध्येच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना कोथरुडमध्ये त्यांच्या कार्यकर्त्याला झालेल्या मारहाण प्रकरणानंतर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आयुक्तांनी वारंवार गुन्हे आढावा बैठकीत सूचना देऊन आणि पोलिसांची झाडाझडती घेऊन देखील पोलिसांना ते सापडत नसल्याचं दिसून येत आहे.
Nilesh Ghaywal Case : निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरणी अहिल्यानगरच्या पोलिसांची चौकशी होणार
फरार गुंड निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरणी अहिल्यानगरच्या पोलिसांची चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरणी तत्कालीन पोलीस निरीक्षक आणि संबंधित कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली आहे. खोटी नावाची कागदपत्रे सादर करून आणि गुन्हे लपवून निलेश गायवळने अहिल्यानगरमधून पासपोर्ट मिळवला आहे. त्यावेळी हे दोघे पोलीस अधिकारी जिल्हा शाखेत कार्यरत होते, त्यांना पासपोर्ट संदर्भातील चौकशी बाबत हजर होण्यास सांगण्यात आले आहे. घायवळ सध्या परदेशात आहे. 2019 ला अहिल्यानगर पोलिसांकडून माहितीवरून पासपोर्ट काढला होता. त्यामुळे या दोघांच्या चौकशीतून काय समोर येतं पाहावं लागणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
























