Pune Crime News: किरकोळ वाद किती टोकाला जाऊ शकतो, याचे धक्कादायक उदाहरण पुण्यात (Pune News) समोर आले आहे. सिंहगड रोड (Pune Sinhagad Road) परिसरात सोमवारी संध्याकाळी तीन अल्पवयीन मुलांनी धारदार शस्त्राने हल्ला करत 19 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. (Pune Crime News)

Continues below advertisement

मृत तरुणाचे नाव करण काशीद असे असून, तो स्थानिक रहिवासी होता. सोमवारी संध्याकाळी भर चौकात ही घटना घडली. प्रत्यक्षदर्शींच्या मते, तिघांनी अचानक करणवर हल्ला चढवत त्याच्यावर सपासप वार केले. गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Pune Crime News: स्नूकर खेळताना निर्माण झालेली खुन्नस

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी करण काशीद आणि आरोपी अल्पवयीन मुलांमध्ये ओळख होती. जानेवारी महिन्यात स्नूकर खेळत असताना करणने आरोपींकडे रागाने पाहिले होते. या क्षुल्लक कारणाचा राग आरोपींनी मनात ठेवला. त्यातूनच त्यांनी करणचा खून करण्याचा कट रचल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

Continues below advertisement

Pune Crime News: नियोजनबद्ध हल्ला

सोमवारी संध्याकाळी आरोपींनी संधी साधत करणला गाठले आणि धारदार शस्त्रांनी त्याच्यावर हल्ला केला. हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Pune Crime News: पोलिसांची तातडीची कारवाई

घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आणि काही तासांतच तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. सर्व आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांना आज बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Nashik Crime News: फरार कुख्यात गुंड हर्षद पाटणकरचं नाशिक पोलिसांना थेट आव्हान, मित्रावर प्राणघातक हल्ला चढवत वाहनांची तोडफोड, पंचवटीत टोळीयुद्धातून थरार

Pune Crime News: दहावीची परिक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला; पुण्यातील ओतूरमध्ये परीक्षा केंद्रातील घटना, 4 जण परीक्षा केंद्रात आले अन्...